Arrival Charges Hike At Mopa Airport Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport: मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वाहन प्रवेश शुल्कात वाढ; टॅक्सीचालकांमध्ये नाराजी

व्यावसायिक वाहनांना 5 मिनिटासाठी 200 रुपये मोजावे लागणार आहेत

Kavya Powar

Arrival Charges Hike At Mopa Airport

मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर व्यावसायिक वाहन प्रवेशाच्या वेळेवर असलेले शुल्क वाढवण्यात आले आहे. टॅक्सी तसेच इतर व्यावसायिक वाहनांना आता विमानतळावर आल्यापासूनच्या पुढील 5 मिनिटासाठी 200 रुपये मोजावे लागणार आहेत.

याआधी टॅक्सी तसेच इतर व्यावसायिक वाहनांसाठी विमानतळावरील आगमन शुल्क 50 रु. इतके होते. ते वाढवून आता 0-5 मिनिटांसाठी 200 रु. करण्यात आले आहे. तर 5-10 मिनिटांसाठी तब्बल 500 रु. करण्यात आले आहे. यामुळे टॅक्सीचालक नाराज झाले आहे.

प्रवासी टॅक्सीमधून उतरून आपले सामान काढेपर्यंतच 5 मिनिटे होऊन जातात, असे मत एका टॅक्सीचालकाने व्यक्त केले आहे.

दरम्यान, बसेसना 30 मिनिट कालावधीसाठी आगमन शुल्क 1000 रु. आहे. दुसरीकडे खाजगी वाहनांना 0-5 मिनिटांसाठी कोणतेही शुल्क आकरण्यात येणार नाही. 5-10 मिनिटांसाठी 50 रु. तर 10 मिनिटांपेक्षा अधिक कालावधीसाठी 500 रु. शुल्क असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT