गोवा प्रदेश काँग्रेस, महिला कॉंग्रेस आणि युवक काँग्रेस Dainik Gomantak
गोवा

Goa: "बलात्काराचा आरोप असणाऱ्या पोलीस निरीक्षकाला लवकर अटक करा"

आज पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीणा (Mukesh Kumar Meena) यांना आज निवेदन देण्यात आले.

दैनिक गोमन्तक

पणजी - बलात्काराचे आरोप (Allegations of rape) करण्यात आलेल्या प्रकरणातील पोलिस (Goa Police) उपनिरीक्षकाविरुद्ध तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी गोवा प्रदेश काँग्रेस, महिला कॉंग्रेस आणि युवक काँग्रेसने आज येथे केली.प्रदेश काँग्रेसच्या तिन्ही संघटनांच्या वतीने आज पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीणा (Mukesh Kumar Meena) यांना आज निवेदन देण्यात आले.या निवेदनात उपनिरीक्षक नारायण पिंगे (Narayan Pinge) यास तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. पिंगे याच्याविरूध्द पिडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार भारतीय दंड संहितेच्या कलम 365,420,323,506-2,427 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोवा (Goa) प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष बीना नाईक, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन भंडारी, युवक काँग्रेसचे अध्यक्ष वरद म्हार्दोळकर यांनी युवक काँग्रेस आणि महिला कॉंग्रेसच्या इतर कार्यकर्त्यां सोबत आज पणजी पोलिस मुख्यालयात पोलिस महासंचालकांना हे निवेदन दिले. कॉंग्रेसने पुढे आपल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंगे याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करावी तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी.पोलिस खात्याने कुठल्याही दबावाखाली न येता योग्य तपास करून पीडित महिलेला या प्रकरणात न्याय मिळायला हवा, असे जनार्दन भंडारी यावेळी म्हणाले. आरोपी पोलिस उपनिरीक्षकाविरूध्द पिडितेची तक्रार दाखल होऊन अनेक दिवस झाले तरी त्याच्या विरोधात आजपर्यंत पोलिसांनी काहीही कारवाई केली नसल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले.

बलात्कार प्रकरणातील आरोपी पोलिसा उपनिरीक्षिकाविरूध्द कारवाई करण्यास पोलिस खाते अपयशी ठरले आहे. आरोपीला शिक्षा होण्याऐवजी त्याची बदली मुरगाव पोलिस स्थानकातून दक्षिण गोव्यातील राखीव पोलिस दलात केली आहे. आरोपीला ही खास वागणूक देण्याचे कारण काय, असा सवाल वरद मार्दोळकर यांनी यावेळी विचारला. पोलिसांनी ज्या पध्दतीने हे प्रकरण हाताळले आहे त्यामुळे पिडितेवर अन्याय होत असल्याचे म्हार्दोळकर म्हणाले.

देशात घडलेल्या निर्भया बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण देशभरातून आरोपीला तात्काळ कठोर शिक्षा करण्याची मागणी झाली होती. पण गोव्यातील पोलिस त्यापासून काही धडा शिकलेले दिसत नाहीत. त्यामुळेच बलात्कार प्रकरणातील आरोपी पोलिस उपनिरीक्षकाला त्याचे वरिष्ठ संरक्षण देत आहेत, असे महिला काँग्रेस अध्यक्ष बीना नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

SCROLL FOR NEXT