Luthra Brothers  Dainik Gomantak
गोवा

Arpora Nightclub Fire Case: ...म्हणून लुथरा बंधूं देशाबाहेर पळाले, हडफडे दुर्घटनाप्रकरणी सरकारी यंत्रणांची मोठी चूक

Administrative Lapse Goa: डफडे येथे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या क्लबचा नेमका मालक कोण याची माहिती सुरवातीला सरकारी यंत्रणेकडे नव्हती.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: हडफडे येथे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या क्लबचा नेमका मालक कोण याची माहिती सुरवातीला सरकारी यंत्रणेकडे नव्हती. त्यामुळे लुथरा बंधूंना देशाबाहेर पळणे शक्य झाले अशी माहिती मिळाली आहे.

आग लागल्यानंतर तेथे पोलिस व अग्नीशमन दलाचे कर्मचारी पोचले. तेथील कर्मचाऱ्यांकडून मालकाचे नाव घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नव्हता कारण तेथे कोलाहाल माजला होता. आत अडकलेल्यांचे नातेवाईक, आप्तस्वकीय बाहेर टाहो फोडत होते.

याच दरम्यान तिकडे दिल्लीत (Delhi) लुथरा बंधूंनी थायलंडला जाण्याची योजना तातडीने तयार केली आणि तिकीटही आरक्षित केले. प्रत्यक्षात त्यांचे विमान थायलंडकडे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहाटे ५.३० वाजता झेपावले. लुथरा बंधू हेच या क्लबचे मालक परवानाधारक असल्‍याची खात्रीशीर माहिती सरकारी यंत्रणेकडे असती तर त्यांना दिल्ली पोलिसांच्या मदतीने दिल्लीतच गोवा पोलिस (Goa Police) पकडू शकले असते.

सरकारी यंत्रणेकडे माहिती हवी

एका वरिष्ठ अधिकाऱ्याला याबाबत विचारले असता त्याने याला दुजोरा दिला. तो म्हणाला, एक क्लब जळाला पण उर्वरित आस्थापनांचे नेमके मालक कोण, ते कोण चालवतात. मालक, क्लब चालक कुठे राहतात, त्यांचे मोबाईल क्रमांक अशी माहिती सरकारी यंत्रणेकडे असणे आवश्यक आहे. अजूनही त्यादिशेने पावले टाकण्यात आलेली नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

MS Dhoni Defamation Case: कॅप्टन कूल कोर्टात 'टॉस' हरला? 100 कोटींच्या मानहानी प्रकरणात 10 लाख भरण्याचे आदेश

Dabolim Airport: दाबोळी विमानतळ बंद होणार? खासदार फर्नांडिस यांच्या दाव्यानं खळबळ, युरी-सरदेसाई आक्रमक; जनआंदोलनाचा दिला इशारा

VIDEO: "भारताला चार गुजराती चालवतायेत, त्यापैकी दोन देश विकतायेत...'' हाय-होल्टेज सामन्यापूर्वी शाहिद आफ्रिदीचं वादग्रस्त वक्तव्य

एक्झिट परमिट संपलं तरी भारतातच मुक्काम! 3 परदेशी नागरिकांवर कारवाई; म्हापसा डिटेंशन सेंटरमध्ये केली रवानगी

Budhaditya Rajyog 2026: कष्टाचं होणार सोनं...! बुधादित्य राजयोग 'या' राशींना करणार मालामाल; भाग्याचीही मिळणार साथ

SCROLL FOR NEXT