Arpora Nightclub Fire Dainik Gomantak
गोवा

Goa Nightclub Fire: 'मै दिल्लीमे था, हमे कुछभी मालूम नहीं'! नाईटक्लब दुर्घटनेप्रकरणी जामीन मंजूर झाल्यावर संशयिताची प्रतिक्रिया

Arpora Nightclub Fire: हडफडे येथील नाईटक्लब दुर्घटनेप्रकरणी कोलवाळ येथील केंद्रीय कारागृहातून जामीन मंजूर झाल्यानंतर भरत सिंग यांची उशिरा सुटका करण्यात आली.

Sameer Panditrao

हडफडे येथील नाईटक्लब दुर्घटनेप्रकरणी कोलवाळ येथील केंद्रीय कारागृहातून जामीन मंजूर झाल्यानंतर भरत सिंग यांची उशिरा सुटका करण्यात आली. तुरुंगातून बाहेर पडताच त्यांनी संबंधित प्रकरणातील सर्व आरोप ठामपणे फेटाळून लावले. ही घटना घडली त्या ठिकाणी आपण उपस्थितच नव्हतो, असा दावा भरत सिंग यांनी केला.

कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर येताना भरत सिंग यांच्यासोबत त्यांचा एक सहकारी होता. यावेळी उपस्थित माध्यम प्रतिनिधींनी त्यांच्यावर असलेल्या आरोपांबाबत तसेच संबंधित कार्यक्रमाच्या कथित गैरव्यवस्थापनाबाबत प्रश्न विचारले. मात्र भरत सिंग यांनी आरोपांकडे दुर्लक्ष करत, “मला काहीच माहिती नाही” आणि “या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही,” असे वारंवार सांगितले.

व्यवस्थापक म्हणून आपली भूमिका होती का आणि आपणच हा कार्यक्रम सांभाळला होता का, असा सवाल पत्रकारांनी केला असता भरत सिंग यांनी ते आरोप नाकारले. त्यांनी सांगितले की, “त्या दिवशी मी दिल्लीमध्ये होतो. मी इथे नव्हतो.”

त्यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यानेही आरोपांना ‘खोटी कहाणी’ असे संबोधत या घटनेशी आमचा काहीही संबंध नसल्याचा दावा केला. पत्रकारांनी सतत प्रश्न विचारून आपल्याला अडकवण्यात आले का, असे विचारले असतानाही भारत सिंग यांनी आपली भूमिका कायम ठेवली आणि लाल रंगाच्या कारमध्ये बसून तेथून निघून गेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket New Rules: क्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर! स्टंप्स उडाले तरी फलंदाज आउट होणार नाही, काय आहे नवा नियम? VIDEO

Navpancham Rajyog 2026: शनि-मंगळाच्या नवपंचम राजयोगाची कमाल! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस; होणार तगडा धनलाभ

UPI MDR Charge: ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, युपीआय पेमेंटवर एमडीआर चार्ज लावण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत रद्द; NPCI चा मोठा निर्णय

8th Pay Commission Updates: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार भरघोस वाढ? आयोगाच्या 5 मोठ्या अपडेट्सवर सर्वांचं लक्ष; 'फिटमेंट फॅक्टर'चं सोप्या भाषेत गणित

Goa Cricket: आर्यन नार्वेकरची कर्णधाराला साजेशी खेळी! गोव्याची बडोद्याविरुद्ध 4 बाद 227 धावांपर्यंत मजल

SCROLL FOR NEXT