Goa Night Club Fire Dainik Gomantak
गोवा

Goa Nightclub Fire: 'हे तर प्रशासनाचे अपयश'! हडफडे दुर्घटनेबाबत राहुल गांधींकडून संवेदना; वाचा महत्वाच्या प्रतिक्रिया..

Arpora Night Club Fire: आग लागलेल्या नाईट क्लबचा मालक सौरभ लुथरा आहे. तो रोमियो लेन चेनचा संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आहे. सौरभ इंजिनिअरिंगनंतर व्यवसायात उतरला होता.

Sameer Panditrao

हडफडे: येथील नाईट क्‍लबमध्‍ये लागलेली आग एक प्रकारे ओढवून घेतलेले संकट आहे. त्‍यात निष्‍पाप २५ जणांना प्राण गमवावा लागला. याबाबत राज्‍यातच नव्‍हे तर देशभरात हळहळ व्‍यक्त होत आहे. तसेच संतापही व्‍यक्त करण्‍यात येत आहे.

आग लागलेल्या नाईट क्लबचा मालक सौरभ लुथरा आहे. तो रोमियो लेन चेनचा संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आहे. सौरभ इंजिनिअरिंगनंतर व्यवसायात उतरला होता. त्याने बर्च, रोमियो लेन, मामाज बुओई यांसारखे ब्रँड लाँच केले आहेत. भारतात त्याला ५० रेस्टॉरंट सुरू करायची होती. तो गोल्ड मेडलिस्ट इंजिनिअर आहे.

सध्या रोमियो लेनचा व्यवसाय २२ शहर आणि ४ देशांमध्ये पसरला आहे. २०१६ पासून सौरभ लुथराला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. सौरभ लुथरासह जनरल मॅनेजर विवेक सिंहला अटक करण्यात आलीय. धक्कादायक बाब म्हणजे क्लब पाडण्यासाठी नोटीस जारी करण्यात आली होती. पण पंचायतीच्या संचालकांनी त्‍यास स्थगिती दिली होती. आता आगीच्या दुर्घटनेनंतर यावरही उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

सरकारचे सपशेल अपयश

ही केवळ दुर्घटना नसून, सुरक्षा व प्रशासनाचे अपयश आहे. सखोल, पारदर्शक चौकशीने जबाबदारी निश्चित केली पाहिजे. अशा दुर्घटना पुन्हा घडू नये, यासाठी खबरदारी घ्यावी. दुर्घटनेमुळे मला खूप दुःख झाले असून, शोकाकूल कुटंुबीयांप्रति मी मनापासून संवेदना व्यक्त करतो.

- राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय नेते तथा खासदार

सरकार बरखास्त करणे गरजेचे

हडफडे येथील नाईट क्लबच्या आगीची घटना केवळ घडली नाही तर ती घडू देण्यात आली. हडफडे सरपंचांनी हा क्लब पाडण्याची नोटीस काढली होती. पण मालकाने पंचायत संचालनालयाकडून मुदत वाढवून घेतली. हे पाहता सरकारवरील लोकांचा विश्‍‍वास उडाला आहे. दारू तस्करी सर्रास सुरू आहे. अबकारी खाते झोपले आहे. पोलिसांच्‍या कार्यक्षमतेबद्दल शंका व्यक्त करण्यात येत आहे. तेव्हा एक तर राज्य सरकारने राजीनामा द्यावा किंवा सरकार बरखास्त करावे.

- विजय सरदेसाई, आमदार (गोवा फॉरवर्ड)

पीडितांना त्‍वरित नुकसान भरपाई द्या

अशा प्रकारची घटना आगसुरक्षा नियमांचे पालन व उपलब्ध यंत्रणांच्या तयारीबाबत गंभीर प्रश्‍‍न निर्माण करते. या दुर्दैवी घटनेमुळे कर्मचारी व पर्यटकांना अपार हानी, मनस्ताप आणि मानसिक आघात सहन करावा लागला. आपल्या आप्तस्वकीयांना गमावलेल्या सर्व कुटुंबीयांप्रति मी मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो आणि जखमींना लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो. सरकारने पीडित कुटुंबीयांना त्‍वरित नुकसान भरपाई, मदत आणि आवश्यक साहाय्य द्यावे.

- ॲड. रमाकांत खलप, माजी केंद्रीय मंत्री

सरकारचा छुपा अजेंडा उघड

मुळात पंचायतीने या नाईट क्लबला स्टॉप ऑर्डर काढली होती. कारण हा क्‍लब बेकायदेशीर सुरू होता. मात्र इतर प्राधिकरणांनी जसे की पंचायत संचालनालय, सीआरझेड, आरोग्य, अबकारी, वीज या विभागांनी क्लब सुरू ठेवण्यास परवानगी दिली. यातून सरकारचा छुपा अजेंडा दिसून येतो. या सर्व प्रकाराला सरकारच जबाबदार आहे. मृतांच्‍या कुटुंबांना आणि जखमींना सरकारने तत्‍काळ द्यावी.

- अमित पालेकर, ‘आप’चे गोवा अध्‍यक्ष

गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

हडफडे दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. अनधिकृतपणे क्लब चालत असताना, सरकारने याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. या दुर्घटनेस, राज्य सरकार तसेच गृहमंत्री जबाबदार आहेत. त्यांनी नैतिक जबाबदारी देऊन राजीनामा द्यावा.

- माणिकराव ठाकरे, काँग्रेस नेते

घटना अतिशय खेदजनक

हडफडे येथील दुर्घटना अतिशय खेदजनक असून, मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. यापुढे अशा दुर्घटना घडू नये, यासाठी गोव्यातील सर्व क्लबचे फायर-सेफ्टी ऑडिट केले पाहिजे. याविषयी मी मुख्यमंत्री व पर्यटनमंत्र्यांना मी पत्र लिहणार.

- मायकल लोबो, कळंगुटचे आमदार

निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी हवी

ही दुर्घटना प्रशासकीय अपयशाचा परिणाम आहे. या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी झाली पाहिजे. परवाना नसतानाही क्‍लब सुरू कसा होता? अग्निशमन विभाग केवळ परवानगी देऊन मोकळा होतो का? अटींची पूर्तता कोण तपासतो? हा क्लब सुरू राहण्यामागे पंचायतीमधील काही घटकांचा सहभाग असून दरमहा हफ्ता घेतला जात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या घटनेमुळे गोव्याच्या पर्यटनावर विपरीत परिणाम होईल.

- कार्लुस फेरेरा, आमदार (काँग्रेस)

भ्रष्‍ट परवाना पद्धती कारणीभूत

नाईट क्लब अग्निकांडातील मृत्यू ही ‘दुर्घटना’ नसून सत्ता, पैसा आणि बेकायदेशीर पर्यटन उद्योग यातील खोल संगनमताचा भीषण परिणाम आहे. ही घटना आकस्मिक नाही तर ती भ्रष्ट परवाना पद्धती, ढासळलेली तपासणी व्यवस्था आणि राजकीय संरक्षणाची थेट देणगी आहे. पर्यटनाच्या नावाखाली चालणारे अतिक्रमण, ड्रग्स-फेस्ट संस्कृती आणि नाईट क्लब माफियांच्या बेकायदेशीर साम्राज्याला सरकारकडून मिळणारा मूक आधार आज जीवघेणा ठरला आहे.

- नितीन फळदेसाई, बजरंग दल गोवा प्रमुख

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Casino Crackdown: कोट्यवधींचा महसूल थकवणाऱ्या दोन बड्या कॅसिनोंना सरकारचा दणका! परवाने केले तत्काळ रद्द; वारंवार नोटीस देऊनही मालकांचं उत्तर नाही

Romeo Lane Illegal Shack: हडफडे घटनेनंतर सरकार 'ॲक्शन मोड'मध्ये! दोन कॅसिनोंचे परवाने रद्द, तर रोमिओ लेनच्या बेकायदा बांधकामावर हातोडा

Horoscope: तुमच्या इच्छा पूर्ण होतील! 'या' राशींचे नशीब चमकणार, जाणून घ्या संपूर्ण भविष्य!

IND vs SA T20: तिलक वर्मानं लगावला 89 मीटरचा गगनचुंबी षटकार, चेंडू थेट स्टेडियमच्या बाहेर; व्हिडिओ पाहून क्रिकेटप्रेमी थक्क!

जबरदस्त डाइव्ह मारली, पण नशिबानं साथ दिली नाही, 'तो' थरारक रनआऊट पाहून धोनीच्या आऊटची आठवण ताजी; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT