Arpora fire tragedy families Dainik Gomantak
गोवा

एकाच घरातील तिघी बहिणी, भाऊ आणि बॅचलर पार्टीसाठी आलेला 'इशाक'; हडफडे क्लब आगीमुळे एका क्षणात अनेक कुटुंबांवर शोककळा

Goa Fire Victim Stories: गोव्यातील हडफडे येथील 'बर्च बाय रोमियो लेन' या नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेने २५ निष्पाप लोकांचा बळी गेला

Akshata Chhatre

Arpora Club Fire Tragedy: गोव्यातील हडफडे येथील 'बर्च बाय रोमियो लेन' या नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेने २५ निष्पाप लोकांचा बळी गेला, त्या घटनेने अनेक कुटुंबांना कायमस्वरूपी दुःख दिले आहे. मृतांमध्ये झारखंडमधील सख्ख्या भावांसह दिल्लीतील तीन सख्ख्या बहिणींचा आणि लग्नापूर्वी बॅचलर पार्टी करण्यासाठी आलेल्या एका तरुणाचा समावेश आहे. या हृदयद्रावक घटनांमुळे गोव्याच्या पर्यटन इतिहासातील ही काळरात्र अधिकच करुण ठरली.

झारखंडमधील दोन सख्ख्या भावांचा अंत

क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत जीव गमावलेल्यांमध्ये झारखंडमधील दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. मृतांच्या कुटुंबियांपैकी एक असलेल्या नारायण माथुर यांनी घटनास्थळी येऊन ही माहिती दिली. ते म्हणाले, मृत्यू पावलेले दोघे माझे पुतणे, म्हणजे माझ्या मोठ्या भावाचे मुलगे होते. मी त्यांच्यासाठी येथे आलो आहे. ते दोघेही या रेस्टॉरंटच्या किचनमध्ये काम करत होते. मला आज सकाळी याबद्दल समजले. आमच्या शेजारील एका व्यक्तीचाही या आगीत मृत्यू झाला असून, आम्ही सर्वजण झारखंडचे रहिवासी आहोत, असे ते म्हणाले.

लग्नाआधीच काळाने साधला डाव!

कर्नाटकातून इशाक या नावाचा एक युवक आपल्‍या पाच मित्रांसमवेत गोव्‍यात बॅचलर पार्टी करण्‍यासाठी आला होता. त्‍याचे लग्न ठरले होते. लवकरच तो बोहल्‍यावर चढणार होता. काल शनिवारी हडफडे येथील नाईट क्‍लबमध्‍ये पार्टी करण्‍यासाठी तोही मित्रांसमवेत गेला होता. पण तेथे लागलेल्‍या आगीत त्‍याचा मृत्‍यू झाला. लग्नगाठ बांधण्‍याआधीच नियतीने डाव साधला.

तीन बहिणींचा करुण अंत; एक बचावली

हडफडेतील भीषण आग दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तीन बहिणींचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक माहिती समोर आली आहे. दिल्ली येथील चार बहिणी क्लबमध्ये आल्या होत्या. त्यापैकी भावना जोशी या थोडक्यात बचावल्या; परंतु सरोज जोशी, अनिता जोशी आणि कमला जोशी यांचा या आगीत करुण अंत झाला. त्यांच्यासोबत आलेले विनोद कुमार यांचाही मृत्यू झाला असून, एका क्षणात कुटुंबातील चार सदस्यांना गमावल्याने त्यांच्या घरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclub Fire: 'आग लागली तेव्हा आम्ही नव्हतो!' लुथरा बंधूंचा लंगडा युक्तिवाद, दिल्ली कोर्टाचा दिलासा देण्यास नकार; 'गोव्याचे उत्तर' ठरणार निर्णायक

Serendipity Arts Festival Goa: कला आणि संस्कृतीचा गोव्यात महासंगम! 12 ते 21 डिसेंबरदरम्यान सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल

Goa Nightclub Fire: गोवा नाईट क्लब आग प्रकरण! दोषींवर कठोर कारवाई होणारच; मुख्यमंत्री सावंत आक्रमक

बेळगावचे विभाजन होणार? नवीन तीन जिल्हे निर्माण करण्याची मागणी; अधिवेशनात चर्चा

Goa Live Updates: आग लागलेली असतानाच लुथरा बंधूंनी थायलंडचे केले तिकीट बुक

SCROLL FOR NEXT