Mapusa JMFC Extends Police Custody of Luthra Brothers Dainik Gomantak
गोवा

Goa Nightclub Fire: लुथरा बंधूंच्या अडचणीत वाढ! जामिनास पीडित कुटुंबांचा विरोध, हस्तक्षेप याचिका दाखल; 7 जानेवारीच्‍या सुनावणीकडे लक्ष

Luthra Brothers Bail: ६ जानेवारी रोजी क्लबचा भागीदार अजय गुप्ता याच्या जामीन अर्जावर तसेच त्यावरील पीडितांच्या हस्तक्षेप अर्जावर सुनावणी होणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: हडफडे येथील ‘बर्च बाय रोमियो लेन’ या क्लबमध्ये लागलेल्‍या भीषण आगीत बळी पडलेल्‍या पीडितांच्या कुटुंबीयांनी मुख्‍य संशयित लुथरा बंधूंच्या जामिनाविरोधात तसेच अन्‍य एका गुन्‍ह्याखालील अटकपूर्व जामिनाविरोधात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे.

त्‍यावर म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात पुढील आठवड्यात ७ जानेवारीला सुनावणी होणार आहे. तसेच भागीदार अजय गुप्ता याच्या जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यानही पीडितांचे म्हणणे न्यायालय ऐकून घेणार आहे.

मुख्‍य संशयित आरोपी गौरव व सौरभ लुथरा या बंधूंवर बनावट कागदपत्रे तयार करणे व फसवणूक केल्याचा आरोप आहे. ६ जानेवारी रोजी क्लबचा भागीदार अजय गुप्ता याच्या जामीन अर्जावर तसेच त्यावरील पीडितांच्या हस्तक्षेप अर्जावर सुनावणी होणार आहे.

दरम्‍यान, ६ डिसेंबर २०२५ च्या मध्यरात्री ‘बर्च बाय रोमियो लेन’ या नाईट क्लबमध्ये भीषण आग लागली होती. एका नृत्य सादरीकरणादरम्यान वापरण्यात आलेल्या ‘इलेक्ट्रिक फटाक्यांमुळे’ क्लबच्या लाकडी छताने पेट घेतला आणि काही मिनिटांतच आग संपूर्ण क्लबमध्ये पसरली. त्‍यात २५ निष्‍पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते.

सरपंच, सचिवाच्‍या अटकेचा मार्ग मोकळा

याच प्रकरणात हडफडे-नागवाचे सरपंच रोशन रेडकर आणि निलंबित सचिव रघुवीर बागकर यांना मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने त्यांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत. तसेच, या आदेशाला स्थगिती देण्याची त्यांची विनंतीही न्यायालयाने अमान्य केल्यामुळे हणजूण पोलिसांना त्यांना अटक करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT