Arpora Nightclub Fire Dainik Gomantak
गोवा

25 जणांचा मृत्यू झालेल्या ‘बर्च’ला परवानगी केवळ सरपंचांचा निर्णय नाही! वकिलांचा युक्तिवाद; अटकपूर्व जामिनावर होणार सुनावणी

Arpora Nightclub Fire: २०२४ मध्ये सरपंचानी त्याला पाडकामाचे आदेश दिले होते मात्र त्यावर पंचायत संचालकांनी स्थगिती आणली होती,असेही वकिलांनी नमूद केले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ नाईट क्लबला लागलेल्या आगी प्रकरणी बुधवारी सुनावणी झाली,सरपंचांची बाजू मांडताना वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, या क्लबला दिलेली परवानगी ही केवळ सरपंचांनी दिलेली नाही. हा निर्णय पंचायत बैठकीत सर्वांच्या मताने घेण्यात आला आहे.

२०२४ मध्ये सरपंचानी त्याला पाडकामाचे आदेश दिले होते मात्र त्यावर पंचायत संचालकांनी स्थगिती आणली होती,असेही वकिलांनी नमूद केले. मात्र न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकण्यासाठी शुक्रवारची तारीख निश्चित केली आहे. म्हापसा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने यापूर्वीच या दोघांचेही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावले होते. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

६ डिसेंबर २०२५ रोजी हडफडे येथील 'बर्च' नाईट क्लबला लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. याप्रकरणी झालेल्या दंडाधिकारी चौकशीत पंचायत प्रशासनाचा मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे.

माजी सरपंच रेडकर यांच्यावर अधिकारांचा दुरुपयोग करून बेकायदेशीर बांधकामाला परवानगी दिल्याचा ठपका ठेवत त्यांना सरपंच पदावरून अपात्र ठरवण्यात आले आहे. तर, सचिव रघुवीर बागकर यांनीही कर्तव्यात कसूर केल्याचे सिद्ध झाल्याने त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. अटकपूर्व जामीन फेटाळल्यापासून दोन्ही संशयित फरार असून हणजूण पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी

हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ नाईट क्लबला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत अटकेच्या टांगत्या तलवारीखाली असलेले पंचायतीचे माजी सरपंच रोशन रेडकर आणि बडतर्फ पंचायत सचिव रघुवीर बागकर यांना तूर्तास कोणताही दिलासा मिळालेला नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जांवरील सुनावणी आता शुक्रवारपर्यंत (९ जानेवारी) तहकूब केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2026 Final: फायनलचा फिव्हर! 6 हजारांची रूम थेट 80 हजारांना; अहमदाबादमध्ये हॉटेल्सचे अन् विमान तिकिटांचे दर गगनाला

VIDEO: वस्तीत घुसला बिबट्या, घरांच्या आसपास बिनधास्त वावर; गोवा - चांदोरमधील थरार पहा..

"पोर्तुगीजांच्या राजवटीतही जीने आपली संस्कृती, अस्मिता टिकवली, ती मराठी गोव्याची खरी राजभाषा"! फळदेसाईंचे प्रतिपादन

Dhurandhar 2 Trailer: हिंदू बहुत ही डरपोक... ! 'धुरंधर 2'चा ट्रेलर रिलीज, हमजा अली अब्बासीच्या क्रूर लूकने वेधलं लक्ष VIDEO

Mirabag: सर्वत्र धरणे, बंधारे बांधून गोव्यात बुद्धिमान माणसानेच राहायचे का? मीराबाग व विरोध करणारे गावकरी

SCROLL FOR NEXT