Michael Lobo Dainik Gomantak
गोवा

Birch Club Fire: ‘बर्च’ अग्नितांडवाचा तपास संथगतीने! मायकल लोबोंचे प्रतिपादन; संबंधितांवर त्वरित कारवाईची मागणी Video

Michael Lobo: हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन क्‍लबमध्‍ये आग लागून २५ जणांचा मृत्‍यू होण्‍याची घटना दुर्दैवी आहे. या क्‍लबचे मालक असलेल्‍या लुथरा बंधूंना पोलिसांनी काहीच दिवसांत अटक केली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन क्‍लबला लागलेल्‍या आग प्रकरणाचा तपास पोलिसांकडून संथगतीने सुरू आहे. याप्रकरणी जिल्‍हाधिकाऱ्यांच्‍या अध्‍यक्षतेखालील समितीने दिलेल्‍या अहवालात ज्‍यांची नावे आहेत, त्‍यांच्‍यावर कारवाई होणे गरजेचे आहे. सध्‍या सुरू असलेल्‍या अधिवेशनात आपण त्‍यावर आवाज उठवणार असल्‍याचे कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना स्‍पष्‍ट केले.

हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन क्‍लबमध्‍ये आग लागून २५ जणांचा मृत्‍यू होण्‍याची घटना दुर्दैवी आहे. या क्‍लबचे मालक असलेल्‍या लुथरा बंधूंना पोलिसांनी काहीच दिवसांत अटक केली; परंतु क्‍लबला बेकायदेशीररीत्‍या परवाने दिलेल्‍या माजी सरपंच रोशन रेडकर आणि सचिव रघुवीर बागकर यांना मात्र अजूनही अटक केली जात नाही. यावरूनच याप्रकरणी पोलिसांचा तपास संथगतीने सुरू असल्‍याचे दिसून येते.

याप्रकरणी सरकारने नियुक्त केलेल्‍या जिल्‍हाधिकाऱ्यांच्‍या अध्‍यक्षतेखालील समितीने आपला अहवाल सादर केलेला आहे. परंतु तो अहवाल आपल्‍याला आतापर्यंत मिळालेला नाही. याबाबत आपण सभागृहात आवाज उठवणार असल्‍याचे आमदार लोबो म्‍हणाले. या बर्च क्‍लबमधील आगीला जबाबदार असलेल्‍या रेडकर व बागकर यांनी सत्र न्‍यायालयात जामिनासाठी अर्ज केलेला होता.

परंतु या प्रकरणाचा सखोल तपास व्‍हावा यासाठी सत्र न्‍यायालयाने या दोघांचेही जामीनअर्ज फेटाळले आहेत. त्‍यामुळे त्‍यांनी आता उच्च न्‍यायालयात धाव घेतलेली आहे. मुळात याप्रकरणी सचिवापेक्षा माजी सरपंच अधिक दोषी आहे. कारण माजी सरपंचाने सचिवाला विश्‍‍वासात न घेता आपल्‍या पदाचा गैरवापर करीत एकाच सर्व्हे क्रमांकात ३३ बांधकामांना मंजुरी दिलेली आहे, असेही त्‍यांनी सांगितले.

दरम्यान, या दुर्घटनेनंतर राज्यभरातून सुरक्षाविषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नाईटक्लब, बार व मनोरंजन स्थळांच्या परवान्यांची फेरतपासणी करण्याची मागणी जोर धरत आहे. अग्निशमन विभाग, नगरपालिका व ग्रामपंचायतीकडून देण्यात येणाऱ्या परवान्यांमध्ये समन्वयाचा अभाव असून त्याचा परिणाम नागरिकांच्या सुरक्षेवर होत असल्याचा आरोप होत आहे.

त्यामुळे अशा आस्थापनांसाठी एकसमान, कठोर व पारदर्शक परवाना प्रणाली लागू करण्याची गरज व्यक्त केली जात असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी शासनाने ठोस धोरण जाहीर करावे, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT