Goa Nightclub Fire Dainik Gomantak
गोवा

बर्च प्रकरणानंतर झारखंडला पळून गेलेला संशयित सापडला, महिन्यानंतर ‘ऑपरेशनल मॅनेजर’ ताब्यात; महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता

Goa Nightclub Fire: ट्रान्झिट रिमांडवर हणजूण पोलिसांनी बिजयला तब्बल एक महिन्यानंतर पकडले आहे. या संशयितास स्थानिक न्यायालयाने ८ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्नितांडव प्रकरणी क्लबचा ‘ऑपरेशनल मॅनेजर’ बिजय कुमार सिंग (३८, रा. झारखंड) याला अटक केल्यानंतर त्याची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

ट्रान्झिट रिमांडवर हणजूण पोलिसांनी त्याला तब्बल एक महिन्यानंतर पकडले आहे. या संशयितास स्थानिक न्यायालयाने ८ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. बर्च दुर्घटनेनंतर संशयित आपल्या मूळ गावी पळून गेला होता.

उल्लेखनीय म्हणजे, दुर्घटनेच्या दिवशी संशयित बिजय सिंग हा क्लबस्थळी हजर होता. या भीषण आग प्रकरणात हणजूण पोलिसांकडून आतापर्यंत ९ जणांना अटक झाली आहे.

क्लबचे दैनंदिन व्यवहार पाहत होता

संशयित कॉर्पोरेट/मुख्य जनरल व्यवस्थापक राजीव मोडक याने दाखल केलेल्या आपल्या जामीन अर्जात ऑपरेशनल मॅनेजर बिजय कुमार सिंग याच्या नावाचा उल्लेख केला होता.

क्लबचे दैनंदिन व्यवहार हा बिजय कुमार सिंगच आणि इतर असोसिएट या क्लबचा व्यवहार पाहत होता आणि तोच बर्च दुर्घटनेला जबाबदार असून आपणास जामीन द्यावा, असे मोडक याने आपल्या जामीन अर्जात दावा केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Winter Session: हिवाळी अधिवेशनाचे बिगुल वाजले! पाच दिवस, धडाकेबाज चर्चा

Goa Assembly Session: गोवा विधानसभा हिवाळी अधिवेशन 2026; पहिल्या दिवसाचे ठळक मुद्दे

Ponda By Election: रितेश, भाटीकर की आणखी कोण? फोंडा पोटनिवडणूक ठरणार विधानसभेची प्रिलीम

अग्रलेख: सरकारला दात आणि नखे असलेला 'लोकायुक्तरूपी वाघ' तरी कसा परवडला असता?

Chimbel: 'तोयार तलाव' नष्ट करणार का? चिंबल युनिटी मॉलविरुद्ध वाल्मिकी नाईकांचा एल्गार; प्रकल्प अन्यत्र हलवण्याचा दिला सल्ला

SCROLL FOR NEXT