Firing At Vasco Dainik Gomantak
गोवा

Shooting At Vasco: मोठी बातमी! वास्कोत चोरट्यांचा पोलिसांवर गोळीबार; एक पोलिस जखमी, चोरटे फरार

एका घरात घरफोडीचा प्रयत्न केल्यानंतर तीन चोरटे पळून जात असताना ही घटना घडली.

Pramod Yadav

Shooting At Vasco: घरफोडीच्या प्रयत्न केल्यानंतर पळून जात असताना चोरट्यांनी पोलिसांवर गोळीबार केला आहे. झुआरीनगर, वास्को येथील MES महाविद्यालय परिसरात मध्यरात्री रात्री दोन वाजता ही घटना घडलीय.

बंगल्यात चोरीचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडल्यानंतर तीन चोरटे पळून जात असताना ही घटना घडली. यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, MES महाविद्यालय, झुआरीनगर येथील एका बंगल्यात रात्री दोन वाजता तीन चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. यावेळी बंगल्याच्या शेजारील लोकांनी याची माहिती वास्को पोलिसांनी दिली. पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांना पाहताच घाबरलेल्या चोरट्यांनी पोलिसांवर गोळीबार केला, यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

दरम्यान, चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, त्यांनी सोबत आणलेल्या बाईक तेथेच सोडल्या. पोलिसांनी तीन बाईक घटनास्थळावरून जप्त केल्या आहेत. त्यातील एक बाईक कर्नाटक पासिंग असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून तीन बाईक जप्त केल्या आहेत, त्याआधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे सांकवाळ झुआरीनगर परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून, चोरट्यांचा कसून तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठ्या घडामोडी, रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार?

SCROLL FOR NEXT