Congress Dainik Gomantak
गोवा

काणकोणात काँग्रेसच्‍या बैठकीत कलगीतुरा!

बंडखोरांच्‍या उपस्‍थितीमुळे गोंधळ; जनार्दन भंडारी गेले निघून

दैनिक गोमन्तक

काणकोण: मोठा गाजावाजा करून बोलाविलेल्या काँग्रेसच्या काणकोणमधील चेतना यात्रेच्या बैठकीत कलगीतुरा पाहायला मिळाला. काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारीवर काणकोणमधून निवडणूक लढविलेले महादेव देसाई यांनी बैठकीला उपस्थिती लावल्याने प्रदेश सरचिटणीस व पक्षाचे काणकोणातील पराभूत उमेदवार जनार्दन भंडारी यांनी बैठक अर्ध्यावर सोडली. त्‍यामुळे गोंधळ उडाला.

या बैठकीला महादेव देसाई यांच्‍यासमवेत त्यांचे समर्थक गावडोंगरीचे माजी सरपंच राजेंद्र देसाई, किशोर देसाई यांनी उपस्थिती लावली. देसाई यांनी सांगितले की, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या विनंतीवरून आपण बैठकीला आलो. राजकीय पक्ष ही कोणाची खासगी मालमत्ता नाही. मी सतरा वर्षांपेक्षा जास्त काळ काँग्रेससाठी इमानेइतबारे काम केले आहे. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी पक्षाच्या तत्कालीन नेत्यांनी माझी उमेदवारी कापली.

त्यामुळे पर्याय नसल्याने तृणमूल काँग्रेसची उमेदवारी स्वीकारावी लागली. मी व माझे कार्यकर्ते बैठकीला उपस्थित राहिल्यानेच जनार्दन भंडारी बैठक सोडून निघून गेल्याचे देसाई यांनी सांगितले. तर दुसरीकडे ‘एके ठिकाणी आगीची दुर्घटना घडल्याने तातडीने जावे लागले’ असे सांगून जनार्दन भंडारी व उपस्थित कार्यकर्त्यांनी वेळ मारून नेली. यावेळी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष युरी आलेमाव व अन्य पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. श्रीस्थळ येथील जी. एम. सिलेब्रेशन सभागृहात ही बैठक घेण्यात आली. यावेळी

गटाध्यक्ष प्रलय भगत, प्रवक्त्या पल्लवी भगत व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र आज बैठकीत झालेल्या गोंधळामुळे काँग्रेस कार्यकर्ते

बिथरले आहेत. यासंदर्भात गटाध्यक्ष प्रलय भगत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT