CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goans In Canada: कॅनडात वास्तव्यास असणारे गोव्यातील नागरिक सुरक्षित आहेत का? CM सावंत म्हणाले...

खलिस्तान दहशतवादी निज्जर यांच्या हत्येवरुन कॅनडा आणि भारत यांच्यात सध्या वादाची ठिणगी पडली आहे.

Pramod Yadav

Goans In Canada: गोव्यात परदेशी महिलांवरील अत्याचार वाढल्याचा हवाला देत, कॅनडातील नागरिकांनी गोवा आणि दिल्लीत विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले. पोलीस महासंचालकांनी राज्यात कॅनडाचे आरोप आणि नियमावली तथ्यहीन असल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कॅनडात वास्तव्यास असणारे गोव्यातील नागरिक सुरक्षित आहेत का? असा प्रश्न विचारण्यात आला.

खलिस्तान दहशतवादी निज्जर यांच्या हत्येवरुन कॅनडा आणि भारत यांच्यात सध्या वादाची ठिणगी पडली आहे. दोन्ही देशातील त्यांच्या नागरिकांसाठी नियमावली जाहीर करण्यात आली, गोव्यात परदेशी महिलांवरील अत्याचार वाढल्याचा हवाला कॅनडाने दिला आहे.

त्यामुळे गोवा आणि दिल्लीत कॅनडातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी अशी सूचना करण्यात आलीय.

कॅनडात असणारे गोव्यातील नागरिक सुरक्षित आहेत का असा प्रश्न मुख्यमंत्री सांवत यांना अलिकडे विचारण्यात आला. कॅनडात राहणाऱ्या गोव्यातील लोकांबद्दल आम्ही केंद्र सरकारला कळविले आहे. अशी माहिती सावंत यांनी दिली.

दरम्यान, परदेशी महिला अत्याचाराबाबत कॅनडाने केलेला दावा तथ्यहीन असल्याचे स्पष्टीकरण गोव्याचे पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी दिले आहे.

गोव्यात २०१५ साली कॅनडातील व्यक्तीविरोधात गुन्हा घडला होता, त्यानंतर त्या देशातील कोणत्याही नागरिकाविरोधात गुन्हा घडल्याची नोंद नाही. असेही जसपाल यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT