Karnataka State Road Transport Corporation
Karnataka State Road Transport Corporation Dainik Gomantak
गोवा

Bus Service : आंतरराज्य बसचालकांचा मनमानी कारभार

दैनिक गोमन्तक डिजिटल

inter-state bus operators : साखळी कदंब बसस्थानकावर आंतरराज्य प्रवास करणाऱ्या कर्नाटकच्या बसेसचे येणे बंद झाले आहे. बेळगाव, हुबळी, सौंदत्ती किंवा अन्य ठिकाणाहून साखळीत आल्यानंतर दत्तमंदिराजवळच्या पुलावरच प्रवाशांना सोडतात आणि पणजीकडे प्रयाण करतात.

कोणी कितीही विनंती केली, तरीसुद्धा बस बसस्थानकावर येत नाही. त्यामुळे प्रवाशांना आंतरराज्य प्रवास करणे कठीण झाले आहे. प्रवाशांना नाहक भुर्दंडाचा फटका बसत आहे.

कदंब परिवहन महामंडळाच्या नियमांनुसार शेजारील राज्यांतून येणाऱ्या आंतरराज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी बसेस बस स्थानकावर थांबा घेणे अनिवार्य आहे. मात्र सर्रास बसवाले बसस्थानकाकडे दुर्लक्ष करतात.

बस स्थानकावर या बसेसचे ये-जा करणारे वेळापत्रकही नाही. कर्नाटकची बस येणार म्हणून अनेक प्रवासी बसस्थानकावर ताटकळत थांबलेले असतात, परंतु बसस्थानकावर बसे न आल्याने अनेकांचा खोळंबा होतो.

ज्यांना कर्नाटकच्या बसेसचे कारनामे माहीत आहेत, ते प्रवासी पुलाजवळ थांबतात. पण ज्यांना या बसेसच्या थांब्याबद्दल माहीत नाही, त्या प्रवाशांच्या प्रवासात व्यत्यय येत आहे.

बेळगाव - गोवा मार्गावर कदंबच्या बसेस खूपच कमी आहेत. त्यामुळे कर्नाटकच्या बसेसवर अवलंबून राहावे लागते. साखळीत अत्याधुनिक व्यवस्थेसह बसस्थानक प्रकल्प बांधला आहे. कर्नाटकच्या बसेस येत नसल्याने बसस्थानकाचा काहीच उपयोग होत नाही. याकडे वाहतूक निरीक्षकांनी लक्ष द्यावे, अशी प्रवाशांची मागणी आहे.

प्रवाशांना नाहक भुर्दंड

दत्त मंदिराजवळच्या पुलावर बसेस थांबविल्या जात असल्यामुळे वाळपई, माशेल, फोंडा किंवा अन्य ठिकाणी जाण्यासाठी दुसऱ्या वाहनांचा वापर करावा लागत आहे. या विनाकारण वेळ आणि पैसेही खर्च होत आहेत.

अनेक वेळा पायलट किंवा रिक्क्षाही मिळत नाही, त्यावेळी ओझे असलेल्या बॅगा घेऊन बसस्थानक गाठावे लागते. संबंधितांनी याकडे लक्ष द्यावे, असे प्रवाशांची मागणी आहे. शिवाय पुलाकडे जागा अरूंद असल्याने प्रवासी व वाहनांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत आहे, त्यामुळे अपघाताचीही शक्यता अधिक आहे.

‘कदंब’च्या गाड्या गायब?

कदंब महामंडळाच्या बेळगाव-गोवा मार्गावर यापूर्वी अनेक बसेस कार्यरत होत्या. परंतु ‘कोविंड’नंतर बऱ्याच बसेस बंद करण्यात आल्या. अनमोड घाट रस्ता दुरुस्तीसाठी बंद झाल्यानंतर काही प्रमाणात चोर्लाघाट मार्गे गाड्या सुरू होत्या.

मडगावहून फोंडा-माशेल-साखळी-चोर्लामार्गावर दोन जलद गाड्याही (नॉन स्टॉप) सुरू होत्या.या दोन्ही गाड्यांचे संपूर्ण आरक्षण ऑनलाईनसुद्धा केले जात होते. पण अचानक कदंबा महामंडळाने या दोन्ही गाड्या बंद केल्या. त्यामुळे माशेल-फोंड्यातील प्रवाशांना बेळगावला जाणे अडचणीचे झाले आहे.

शिवाय कर्नाटक बसचालकांच्या मनमानी कारभारांमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महामंडळाने या जलद गाड्या सुरू कराव्या, अशी प्रवाशांची मागणी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT