Arambol Theft Dainik Gomantak
गोवा

Arambol Theft: हरमल परिसरातील चोरी प्रकरणाचा तपास ठप्प, सीसीटीव्ही पुरावे मिळूनही तपास मंदावला

Arambol theft investigation: हरमल येथे एप्रिल महिन्याती चोरी प्रकरणाला तब्बल १५ दिवस उलटून गेले असले तरी अद्याप आरोपींचा ठोस मागमूस लागलेला नाही.

गोमंतक ऑनलाईन टीम

हरमल: हरमल येथे एप्रिल महिन्याती चोरी प्रकरणाला तब्बल १५ दिवस उलटून गेले असले तरी अद्याप आरोपींचा ठोस मागमूस लागलेला नाही. या प्रकरणात एक महत्त्वाचा धागा सापडल्याने नाईक कुटुंबीयांनी काहीसा दिलासा व्यक्त केला होता, मात्र केवळ दिलासा मिळून उपयोग नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

तपास अधिकारी पथकासह मध्यप्रदेशात गेले होते. मात्र तेथील परिस्थिती धोकादायक असल्याने आरोपींना शोधणे सोपे नसल्याचे बोलले जाते. पोलिसांवर दगडफेक किंवा जीवघेण्या हल्ल्याचा धोका असल्याने तपासात अडथळे येत असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात वापरलेली स्कूटर पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संशयितांचे चेहरे कैद झाले असल्याने सुरुवातीला तपासाला गती मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र चोरटे अत्यंत सावध असल्याने ते मागमूस टाळण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. उच्च तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

सध्या तपास अधिकारी रजेवर असल्याने या प्रकरणाचा ताबा नेमका कोणाकडे आहे, याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे तपास प्रक्रियेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळ व स्थानिक नागरिकांनी पोलिसांना निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी केली होती. आमदार जीत आरोलकर यांनाही या निवेदनाची प्रत देण्यात आली असून त्यांनी पोलिसांना आवश्यक सूचना दिल्याचे समजते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT