Arambol Police station Dainik Gomantak
गोवा

हरमलमध्ये ‘न्याया’ची वाटच बिकट

अडगळीत अडकली पोलिस चौकी; 20 वर्षे कामच नाही

दैनिक गोमन्तक

मोरजी : हरमल किनारी भागातील पोलिस चौकीला मागच्या वीस वर्षांपासून रस्ता नाही. शिवाय त्या ठिकाणी जाण्यासाठी व्यवस्थित वाट नसल्याने तक्रारदारांची बरीच धांदल होत आहे. त्याबद्दल सध्या नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहे.

मांद्रे मतदारसंघातील किनारी भागात मोठ्या प्रमाणात पर्यटन हंगामात लाखो देशी-विदेशी पर्यटक येतात आणि या पर्यटनामुळे येथील पर्यटन व्यवसाय चालीस लागत असतो. त्याचबरोबर पर्यटन हंगामात लहान मोठ्या चोऱ्‍या, खून, मारामाऱ्या, बलात्कार, विनयभंग अशा घटना घडतात. या सर्व घटनांची स्थानिक पोलिस चौकीला माहिती द्यावी यासाठी नागरिक पोलिस चौकीचा आधार घेतात, परंतु हरमल येथील पोलिस चौकीकडे जाण्यासाठी गेल्या वीस वर्षांपासून रस्ताच नाही अशी स्थिती आहे.

एका जुन्या प्राथमिक शाळा इमारतीत हे पोलिस चौकी आहे. या चौकीकडे दुचाकीसुद्धा व्यवस्थित जाण्याची सोय नाही. त्यामुळे तक्रारदारांना नक्की पोलिस चौकी कुठे आहे याचा पत्ता लागत नसल्याने सरकारने या पोलिस चौकीकडे व्यवस्थित रस्ता करावा आणि या पोलिस चौकीला पोलिस स्टेशनचा दर्जा द्यावा, अशी मागणी हरमल येथील माजी सरपंच डॅनियल डिसोझा, काँग्रेस अध्यक्ष नारायण रेडकर, सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेश मयेकर आदींनी केली आहे.

या पोलिस चौकीवर येण्यासाठी दोन जमीनदारांच्या वादामुळे पक्का रस्ता होत नाही. आजपर्यंत सरकारनेही तसे प्रयत्न केले नाहीत. या मतदारसंघातून ज्या ज्या आमदारांनी विधानसभेत आवाज उठवला त्यांनाही यश नाही. जनतेला सुरक्षिततेची गरज आहे आणि ती सुरक्षा पोलिसांकडून अपेक्षित असते, परंतु हरमल पोलिस चौकीकडे साधी दुचाकी व्यवस्थित पोचू शकत नसल्याने पोलिसांपर्यंत तक्रारदारांच्या तक्रारी पोचणे अवघड झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI Opening Ceremony: 55व्या इफ्फीच्या ग्रॅंड ओपनिंग सेरेमनीला दिग्गज लावणार हजेरी; गोव्यात अवतरणार अवघे बॉलिवूड!

Cash For Job Scam: मंत्री गोविंद गावडेंच्या कार्यालयातील माजी कर्मचाऱ्याला 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Syed Mushtaq Ali Trophy: सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत 'दीपराज' करणार गोव्याचं नेतृत्व; सुयश उपकर्णधार!

Goa News: लखनौला जाणारे विमान उड्डाणानंतर 20 मिनिटांनी माघारी परतले, गोंधळाची स्थिती; गोव्यातील ठळक घडामोडी!

CM Pramod Sawant: गोमंतकीयांनो सावधान, भुलथापांना बळी पडू नको; वाढत्या फसवणूकीच्या घटनांवर मुख्यमंत्र्यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT