Fish Festival Dainik Gomantak
गोवा

Goa Fish Festival 2025: पणजीत मेगा 'फिश फेस्टिव्हल'; यंदा काय खास? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Aqua Goa Mega Fish Festival 2025: मत्स्य संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच आधुनिक मत्स्यपालन व व्यवसाय संधींची माहिती देण्यासाठी ‘अ‍ॅक्वा गोवा मेगा फिश फेस्टिव्हल २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: मत्स्यउद्योग संचालनालयातर्फे राज्यातील समृद्ध मत्स्य संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच आधुनिक मत्स्यपालन व व्यवसाय संधींची माहिती देण्यासाठी ‘अ‍ॅक्वा गोवा मेगा फिश फेस्टिव्हल २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवसांचा हा महोत्सव १० ते १२ जानेवारी दरम्यान कंपाल येथील गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या मैदानावर होणार आहे.

या महोत्सवात तिन्ही दिवस सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत मत्स्य क्षेत्रातील महत्त्वाच्या विषयांवर सत्र होणार आहे तर त्यानंतर शालेय विध्यार्थ्यांसाठी (Students) विविध स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. गोव्यातील मुलांसाठी विशेष स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धांमध्ये नृत्य, बेस्ट आउट ऑफ वेस्ट, फॅन्सी ड्रेस, मास्टर अँड मिस अक्वा, चित्रकला, पोस्टर बनवणे आणि मातीचे शिल्पे यासारख्या विविध प्रकारच्या स्पर्धा आहेत. मासे, समुद्री जीव, अंडरवॉटर लाइफ इ. या स्पर्धांसाठी विविध वयोगटांतील मुले सहभागी होऊ शकतात.

या विषयांवर होणार मार्गदर्शन

१० जानेवारी रोजी 'मत्स्य शिक्षण' आधारित तरुणांसाठी मत्स्यशेतीतील करिअर संधी आणि मत्स्य व्यवसायातील उद्योजकता विषयावर मार्गदर्शन होणार आहे. ११ जानेवारी रोजी 'मत्स्य उत्पादने व उप-उत्पादने' विषयावर आधारित मासे (Fish) हाताळणीतील सर्वोत्तम व्यवस्थापन पद्धती आणि मूल्यवर्धित समुद्री खाद्य पदार्थांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण अशी दोन सत्रे होणार आहेत. तसेच शेवटच्या दिवशी 'मत्स्य संवर्धन व जलीय कृषी' विषयावर आधारित धोक्यात आलेल्या सागरी प्रजातींचे संरक्षण व सजावटीसाठी मत्स्यपालन : सुंदर व कलात्मक मत्स्यालय तयार करण्याचे कौशल्य संदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल.

मुलांसाठी विशेष स्पर्धा

नृत्य स्पर्धा : विषय - फिशर फोक (वयोगट - १-५ ते ८ वर्षे, गट २-९ ते १५ वर्षे)

बेस्ट आउट ऑफ वेस्ट : विषय - स्वतःचे एक्वेरियम तयार करणे (वयोगट - १२ वर्षाहून अधिक)

फॅन्सी ड्रेस : विषय - अक्वा वर्ल्ड (वयोगट - ५ ते ११ वर्षे)

मास्टर अॅण्ड मिस अक्वा : विषय - फिशिंग फॉर फॅशन/ओशनिक अवतार (वयोगट - १२ ते १७ वर्षे)

चित्रकला : विषय - अक्वा वर्ल्ड (वयोगट - ५ ते १० वर्षे)

पोस्टर बनवणे : विषय - गोव्याच्या समुद्री परिसंस्थेची आश्चर्यकारक दुनिया (वयोगट - ११ ते १८ वर्षे)

मातीचे शिल्पे : विषय - अंडरवॉटर लाइफ, (वयोगट - ११ ते १८ वर्षे)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT