Goa Illegal Hotels Dainik Gomantak
गोवा

Goa Illegal Hotels : कारवाईसाठी नोडल अधिकारी नेमा; पर्यटन खात्याची मागणी

गोव्यात बेकायदेशीर हॉटेल वाढली

दैनिक गोमन्तक

Goa Illegal Hotels : राज्‍यात बेकायदा हॉटेल्‍सचा सुळसुळाट वाढल्‍याने यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पर्यटन खात्‍याने राज्‍यातील सर्व पर्यटनपूरक उद्योगांची खात्‍याकडे नोंदणी करणे सक्‍तीचे केले आहे. तरीही किनारी भागातील घरांमध्ये, निवासी परिसरात बेकायदेशीरपणे लॉजिंगचा व्‍यवसाय केला जातो. अशा बेकायदा हॉटेल्‍सचा शोध घेण्यासाठी वीज आणि सार्वजनिक बांधकाम खात्‍याने नोडल अधिकाऱ्यानी नेमणूक करावी, अशी सूचना पर्यटन खात्‍याने केली आहे.

(Goa Illegal Hotels)

बेकायदेशीर हॉटेल‍स आणि लॉजिंगवर वीज आणि साबांखा त्‍यांची वीज आणि पाणी जोडणी कापण्याची कारवाई करू शकतात. दोन्‍ही खात्‍यांनी नोडल अधिकारी नेमल्‍यास अशी कारवाई तातडीने करणे शक्‍य होईल.

तसेच बेकायदेशीर गोष्टींवर आळा घालता येईल, अशी सूचना पर्यटन खात्‍याने केली आहे. अनेक निवासी परिसरात तसेच घरांमध्ये लॉजिंग चालतात, विजेचे आणि पाण्याचे बील घरगुती म्‍हणून भरतात. यामुळे सरकारचा महसूलही बुडत असल्‍याचे या सूचनेत म्‍हटले आहे.

बेकायदा हॉटेल्‍स, लॉजिंग चालकांवर कारवाई करण्यात यावी यासाठी गेल्या महिन्यात गोवा नोंदणी पर्यटन व्यापार कायद्यात सुधारणा करण्यात आली. नवीन कायद्यात संबंधित निवासस्‍थान सील करण्याची तरतूद करण्यात आली असून त्यांचा पाणी आणि वीजपुरवठाही खंडित करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

राज्‍य सरकार बेकायदा व्‍यवसायावर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्‍या वर्षांपासून प्रयत्‍न करत आहे. तसेच या समस्येविषयी पर्यटनपूरक व्‍यावसायिक संघटनांनी याविषयी सरकारकडे साकडे घातले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Omkar Elephant: 'आता गोवाच मदत करू शकतो', ओंकारची महाराष्ट्रात फरपट; सिंधुदुर्गातील नागरिकांचे मंत्री राणेंना आवाहन

IFFI Goa 2025: गोमंतकीय कलाकार, सिनेकर्मींचे इफ्फीत स्थान काय? आणखी एक ‘फ्लॉप’ आवृत्ती..

Goa Live News: रुमडामावाडा येथे 'रॅश ड्रायव्हिंग'मुळे भीषण अपघात; 55 वर्षीय स्कूटरस्वाराचा मृत्यू

Narendra Modi Resolutions: PM मोदींचा गोवा दौरा आणि त्यांचे 9 संकल्प तडीस नेण्याचे आव्हान

गोव्याची हिरवाई नष्ट होतेय, त्याकडे लक्ष द्या! ३ विद्यार्थिनींनी अवैध बांधकामांविरुद्ध केले Reel; ‘इको थिंकर्स फेस्ट’ उपक्रम

SCROLL FOR NEXT