Viksit Goa Canva
गोवा

सहा महिन्यांत तयार होणार ‘विकसित गोवा’चा आराखडा; ‘चाणक्य सेवा’ची सल्लागार म्हणून नियुक्ती

Goa Vision 2047: राज्य सरकारने विकसित गोवा २०४७ पथदर्शी आराखडा तयार करण्यासाठी नव्याने प्रयत्न सुरू केले आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

Viksit Goa 2047

पणजी: राज्य सरकारने विकसित गोवा २०४७ पथदर्शी आराखडा तयार करण्यासाठी नव्याने प्रयत्न सुरू केले आहेत. ‘चाणक्य सेवा’ या खासगी कंपनीला सल्लागार म्हणून नियुक्त करून हा आराखडा सहा महिन्यांत तयार करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

हा आराखडा तयार करण्यासाठीचे काम ‘चाणक्य सेवा’ या कंपनीकडे सोपवण्यावर राज्य मंत्रिमंडळाने मोहोर उमटविली आहे. यापूर्वीही सरकारने असा आराखडा तयार करण्याचा प्रयत्न केला होता. नंतर बोस्टन कन्सल्टींग कंपनीला असा आराखडा तयार करण्यासाठी दिलेले कंत्राट सरकारने रद्द केले होते.

अल्प मुदतीचे, मध्यम मुदतीचे आणि दीर्घकालीन नियोजन कसे केले पाहिजे, याविषयीचे मार्गदर्शन या नव्या दस्तावेजाच्या माध्यमातून केले जाणार आहे.

दस्तावेजासाठी चार कोटींची तरतूद

विकसित भारत २०४७ च्या धर्तीवर विकसित गोवा २०४७ हे लक्ष्य सरकारने ठेवले आहे. ते गाठण्यासाठी सरकारने कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये काय काय केले पाहिजे, याचे मार्गदर्शन करणारा असा हा दस्तावेज असेल. गोव्याचे मूळ सौंदर्य न बिघडवता आणि गोव्याची ओळख पुसून देता विकसित गोवा कसा करता येईल, याविषयी या कंपनीने अहवालाच्या माध्यमातून मार्गदर्शन करणे सरकारने अपेक्षित धरले आहे. हा दस्तावेज तयार करण्यासाठी सरकार तब्बल चार कोटी रुपये खर्च करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT