Goa Job Opportunities | Government Job Dainik Gomantak
गोवा

Goa Government Job: सरकारी नोकरीची आस; पण उमेदवार चिंतेत!

Goa Government Job: 147 पदांसाठी 29 रोजी लेखी परीक्षा: 4 वर्षांपूर्वी अर्ज; पण वयोमर्यादेच्या अटीमुळे शंका

दैनिक गोमन्तक

Goa Government Job: दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कचेरीने जाहीर केलेल्या 147 पदांसाठी हजोरांच्या संख्येने अर्ज आलेले आहेत. हे सर्व उमेदवार 29 सप्टेंबर रोजी होणारी लेखी परीक्षा देण्याच्या तयारीला लागले आहेत खरे. पण वयोमर्यादेच्या अटीमुळे त्यातील शेकडो उमेदवारांना सरकारी नोकरीचे स्वप्न तर भंगणार नाही ना,अशी शंका सतावत आहे.

या पदांसाठी चार वर्षांपूर्वी अर्ज मागविण्यात आले होते. पण या ना त्या कारणाने या पदांसाठीच्या भरती प्रक्रियेला विलंब होत गेला. सरकारी नियमाप्रमाणे 45 वर्षे ओलांडलेल्यांना सरकारी नोकरीत सामावून घेता येत नाही. त्यामुळे या पदांसाठी अर्ज केलेल्यांपैकी काही जणांचे 45 हून अधिक झालेले आहे.

ही वयोमर्यादा ओलांडलेल्या काहीनी आपल्याला वयोमर्यादेत सूट द्यावी, अशी अधिकाऱ्यांकडे विनंती केली आहे. चार वर्षांपूर्वी जेव्हा त्यांनी अर्ज केला होता. तेव्हा त्यांनी वयोमर्यादा ओलांडलेली नव्हती. जर त्यांना सूट दिली नाही तर अनेकजण लेखी परीक्षेलाही बसणार नाहीत, असे कळते.

मात्र काही जणांनी 29 सप्टेंबरच्या लेखी परीक्षेला बसण्याचा निर्धार केलेला आहे. ज्या पदांसाठी अर्ज मागविले आहेत, त्यात 15 स्टेनोग्राफर्स, 9 तलाठी, 92 कारकून व 31 मल्टी टास्किंग कर्मचाऱ्यांसाठीचा समावेश आहे. या संदर्भात या नोकरभरती प्रक्रियेशी संबंधित सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की वयोमर्यादेचा प्रश्र्न अर्जांची छाननी करताना किंवा लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर उपस्थित होईल. आताच आपण काहीही वक्तव्य करू शकत नाही.

लेखी परीक्षेची चौथी खेप

अधिकाऱ्यांनी लेखी परीक्षा जाहीर करण्याची ही चौथी खेप आहे. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केले होते, त्यातील बरेचजण दुसऱ्या ठिकाणी नोकरीत आहेत. जेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांच्याशी थेट फोनवरून किंवा ईमेलवरून संपर्क साधला तेव्हा हे उघड झाले. शनिवार व रविवार असे दोन दिवस जिल्हाधिकारी कार्यालयाने हजारो उमेदवारांशी संपर्क साधून लेखी परीक्षेची सूचना दिलेली आहे.

या नोकरभरतीसाठी पूर्वीच उशीर झाल्याने व यात उमेदवारांचा कसलाही दोष नसल्यामुळे जे कोण लेखी परीक्षेत उत्तिर्ण होतील किंवा जे नोकरीसाठी पात्र ठरतील, अशा वयाची ४५ वर्षे ओलांडलेल्यांना नोकरीस समावून घेणे योग्य ठरेल. जर असे केले नाही तर या उमेदवारांवर अन्याय केल्यासारखे होईल.
-क्लीओफात आल्मेदा कुतिन्हो,ज्येष्ठ वकील

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चांगलीच खोड मोडली! जिवंत कोळंबी खाण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोरीचा व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी उठवली टीकेची झोड

Ro-Ro Car Train Service: गणेशोत्सवापूर्वी कोकण रेल्वेची पहिली रो-रो कार ट्रेन गोव्यात दाखल, जाणून घ्या भाडे?

Porvorim: ओ कोकेरो ते मॉल दी गोवा रस्ता 5 दिवसांच्या गणेश चतुर्थीनंतरच होणार बंद; CM सावंतांनी केले स्पष्ट

Asia Cup 2025: टी-20 आशिया कपमध्ये भारताच्या नावावर 'महा कीर्तिमान'! 'या' संघाविरुद्ध उभारला धावांचा डोंगर; यंदा कोण मोडणार टीम इंडियाचा रेकॉर्ड?

Goa Waterfall Ban: पावसाळ्यातील अपघातांवर अंकुश! उत्तर गोव्यातील धबधबे अन् नद्यांमध्ये प्रवेशास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

SCROLL FOR NEXT