Crime News: चिंबल मुरगन खूनप्रकरणी आरोप निश्‍चितीचा आदेश

Crime News: चिंबल येथील 17 वर्षीय मुरगन गौंडर याच्या खूनप्रकरणी चौघांविरुद्ध आरोप निश्‍चितीचा आदेश सत्र न्यायालयाने दिला आहे.
Crime News
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Crime News: चिंबल येथील 17 वर्षीय मुरगन गौंडर याच्या खूनप्रकरणी चौघांविरुद्ध आरोप निश्‍चितीचा आदेश सत्र न्यायालयाने दिला आहे. चाकूने भोसकून मयताचा खून केला त्यावेळी सर्व संशयित तेथे होते तसेच त्या सर्वानीच त्याच्यावर हल्ला केला होता. त्यामुळे या सर्व संशयितांविरुद्ध आरोप निश्‍चितीसाठीचे पुरेसे पुरावे आहेत असे निरीक्षण न्यायालयाने केले.

Crime News
Margao Police: मडगाव पोलिसांची जामा मशिद समितीसोबत विस्ताराने चर्चा

जुने गोवे पोलिसांनी मुरगन गौंडर याच्या खूनप्रकरणी प्रतिक्षा ऊर्फ निलिमा गौंडर, लिंगनाथ पालयेकर, परशुराम गौंडर व हेमंत पालकर याना अटक केली होती. सर्वांविरुद्ध भादंसंच्या कलम ३२४, ५०४, ५०६, ३०२ व २०१ खाली गुन्हा दाखल केला होता. मुरगन गौंडर याला चाकूने भोसकून खून केल्यानंतर वापरण्यात आलेला चाकू गायब केला होता.

पोलिसांनी याप्रकरणी तपास करून चौघांविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होता. आरोप निश्‍चितीच्या सुनावणीवेळी संशयितांच्या वकिलांनी युक्तिवाद करताना मयताचा खून चाकूने एकदा वार केल्यानंतर झाला होता. लिंगनाथ पालयेकर याने चाकूने भोसकले होते त्यामुळे इतर संशयितांचा या खुनाशी काहीच संबंध नसल्याचा दावा केला होता. तो न्यायालयाने फेटाळून लावून सर्व संशयित या गुन्ह्याला जबाबदार असल्याचे निरीक्षण केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Love Affair Murder Greater Noida
Goa Uncle Murder Case
Mopa Formula Racing Event
Goa Spa Owner Rape Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com