Manohar Parrikar Scholarship X
गोवा

Manohar Parrikar Scholarship: पर्रीकर स्कॉलर योजनेचे अर्ज संकेतस्थळावर; अधिक माहितीसाठी क्लिक करा

Manohar Parrikar Goa Scholar Scheme: शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ या वर्षाकरिता मनोहर पर्रीकर स्कॉलर योजना २०१८ चे अर्ज २३ डिसेंबरपासून उच्च शिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक भूषण सावईकर यांनी दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

Manohar Parrikar Goa Scholar Scheme 2024 25

पर्वरी: शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ या वर्षाकरिता मनोहर पर्रीकर स्कॉलर योजना २०१८ चे अर्ज २३ डिसेंबरपासून उच्च शिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक भूषण सावईकर यांनी दिली.

दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या संकल्पनेतून साकारलेली राज्य सरकारची ही प्रमुख योजना आहे. २३ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून उच्च शिक्षण संचालनालयाच्या http://www.dhe goa.gov.in संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध आहेत. हा अर्ज ३१ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध असेल, असे संचालक सावईकर यांनी सांगितले.

इथे साधू शकता संपर्क

अधिक माहितीसाठी अथवा कोणत्याही प्रश्नांसाठी कार्यालयीन वेळेत ०८३२-२४१५५८५/२४१०८२४ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे उच्च शिक्षण संचालनालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

अर्जदारांना सूचना

भारतात अथवा भारताबाहेर पदव्युत्तर शिक्षण घेत असलेला अथवा पीएच.डी करत असलेला कोणताही पात्र उमेदवार या योजनेसाठी अर्ज करू शकतो. उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जदाराने ऑनलाइन अर्जात भरलेला तपशीलच केवळ ग्राह्य मानून तेवढाच दस्तावेज किंवा तपशील स्वीकारला जाईल. निवडलेल्या उमेदवारांनाच मुलाखतीची वेळ व दिनांक सांगितली जाईल. कोणत्याही स्वरूपात प्रचार करणारा अथवा दबाव टाकणारा उमेदवार त्वरित अपात्र ठरविण्यात येईल.

अशी चालणारी कार्यप्रणाली

१अर्जदाराने ऑनलाइन अर्ज सबमिट केल्यानंतर त्याला तत्काळ म्हणजे एका मिनिटांत सबमिट केलेल्या तपशीलासह ईमेल पाठविला जाईल.

२ या इमेलची प्रिंट आउट, त्यावर चिकटवलेला अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वयं-साक्षांकित केलेली कागदपत्रे/प्रमाणपत्रे यांच्या प्रती १५ फेब्रुवारीपर्यंत उच्च शिक्षण संचालनालय, पर्वरी येथे स्पीडपोस्टने किंवा हँड डिलीव्हरीद्वारे जमा करावयाच्या आहेत.

३पहिल्या टप्प्यात स्क्रिनिंग समितीद्वारे अर्जदारांची निवड करण्यासाठी आवश्यक असलेले तपशील गोळा केले जातील. दुसऱ्या टप्प्यांत निवड समितीला आवश्यक असलेले तपशील केवळ निवडलेल्या उमेदवारांकडूनच गोळा केले जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

बिट्स पिलानीत 20 वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य का संपवले? समोर आले कारण Watch Video

Fake IAS Officer: मुख्यमंत्री-राज्यपालांसोबत फोटो, यूपी-बिहार ते गोवापर्यंत पसरले नेटवर्क, कोट्यवधींचा घातला गंडा; बनावट आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT