Ponda Municipal Election  Dainik Gomantak
गोवा

Ponda Municipal Election 2023: फोंड्यात आणखी तीन उमेदवारांकडून अर्ज दाखल

नगरपालिका निवडणूक : एकूण उमेदवारी अर्जांची संख्‍या पोचली 9 वर

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda Municipal Election 2023 फोंडा नगरपालिका निवडणुकीसाठी आज शनिवारी तिघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. प्रभाग क्रमांक ७मधून भारत पुरोहित, 8 मधून प्रतीक्षा नाईक तर त्यात प्रभाग क्रमांक 15 मधून गिताली तळावलीकर यांचा समावेश आहे. या 3 अर्जांमुळे एकूण उमेदवारी अर्जांची संख्‍या 9 झाली आहे.

येत्या मंगळवारपर्यंत सर्व उमेदवारी अर्ज दाखल होतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत असून सोमवार दि. 17 एप्रिल रोजी सर्वाधिक अर्जांची अपेक्षा आहे. निवडणूक अधिकारी रघुराज फळदेसाई यांच्याकडे उमेदवारी अर्ज देण्यात आले. यावेळी फोंड्याचे मामलेदार विमोद दलाल उपस्थित होते.

फोंडा पालिका निवडणुकीत भाजपने आपले पॅनल उतरविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच फोंड्याचे आमदार आणि कृषीमंत्री रवी नाईक यांनी ही घोषणा केल्यामुळे सत्ताधारी भाजपविरोधात अन्य पॅनल उतरते की उमेदवार अपक्ष लढतात ते पाहावे लागेल.

दरम्‍यान, प्रभाग क्रमांक 15 च्या उमेदवार गीताली तळावलीकर या विद्यमान नगरसेवक व माजी नगराध्यक्ष आहेत.

यावेळी त्‍या तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. माझ्‍या प्रभागातील बहुतांश मते इतर प्रभागात गेल्‍याने माझे मतदार विखुरले गेले आहेत.

तरीसुद्धा मी निश्‍चितच निवडून येईन, असा विश्‍‍वास त्‍यांनी व्‍यक्त केला. तर, प्रभाग क्रमांक 7 मधून निवडणूक रिंगणात उतरलेले भारत पुरोहित यांनी समर्थकांच्या आग्रहास्तव उमेदवारी दाखल केल्याचे सांगितले.

प्रदीप नाईक यांनी कन्‍येला उतरविले रिंगणात

प्रभाग क्रमांक 8 च्या उमेदवार प्रतीक्षा नाईक या विद्यमान नगरसेवक व माजी नगराध्यक्ष प्रदीप नाईक यांच्या कन्या आहेत.

यावेळी प्रदीप नाईक यांचा प्रभाग महिलांसाठी राखीव ठेवल्याने त्‍यांनी आपल्या कन्येला निवडणुकीत उतरविले आहे.

प्रभागातील बहुसंख्य मतदारांचा मला पाठिंबा असून वडिलांनी केलेल्या विकासकामांच्या बळावर मी निश्‍चितच निवडून येईन, असा विश्‍वास प्रतीक्षा नाईक यांनी व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT