Cyber Crime Dainik Gomantak
गोवा

Cyber Crime: 'ॲपल सपोर्ट'च्या नावाखाली अमेरिकनांची लूट; बांबोळीतील आलिशान व्हिलावर सायबर पोलिसांचा छापा, 10 जण अटकेत

Apple Support Scam Goa: बांबोळी (तिसवाडी) येथील ‘अल्देईया द गोवा’ या आलिशान व्हिलावर छापा टाकून पोलिसांनी एका गोमंतकीय तरुणासह १० जणांना अटक केली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: ॲपल सपोर्ट सेंटरचे कर्मचारी असल्याचे भासवून अमेरिकेतील नागरिकांची तांत्रिक मदतीच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक करणाऱ्या बेकायदेशीर आंतरराज्य कॉल सेंटरचा गोव्याच्या सायबर गुन्हे शाखेने पर्दाफाश केला.

बांबोळी (तिसवाडी) येथील ‘अल्देईया द गोवा’ या आलिशान व्हिलावर छापा टाकून पोलिसांनी एका गोमंतकीय तरुणासह १० जणांना अटक केली. अटक केलेल्यांमध्ये कुणाल शहा (४१, अहमदाबाद), देवर्ष श्रीवास्तव (२१, नोएडा), अभिजित परमार (२५, गुजरात), ध्रुव द्विवेदी (२९, उत्तर प्रदेश), राज संगमा (२७, शिलाँग), श्रेयस लुडबे (२५, मालाड-पश्चिम, मुंबई), ब्रिजेश तेलैया (२८, गुजरात), ज्युड परेरा (३२, मुरगाव), सोफियान लालू (१९, मेघालय) आणि रवी थापा (२७, मेघालय) यांचा समावेश आहे.

अल्देईया द गोवा येथील व्हिलामधून ऑनलाइन बेकायदेशीर व्यवहार सुरू असल्याची माहिती २१ सप्टेंबर रोजी सायबर पोलिसांना मिळाली. माहितीची पडताळणी करून पोलिसांनी छापा टाकला असता तेथे बेकायदेशीर कॉल सेंटर सुरू असल्याचे आढळले. कारवाईत ९ लॅपटॉप, ९ मोबाईल फोन, एक टीपी-लिंक राऊटर आणि अनेक हेडसेट जप्त करण्यात आले.

संशयितांकडून लॅपटॉप, मोबाईल फोन, व्हीओआयपी सेवा आणि अमेरिकेतील बनावट दूरध्वनी क्रमांकांचा वापर केला जात होता. अमेरिकेतील संगणक व ॲपल वापरकर्त्यांच्या स्क्रीनवर ‘आयओएस’ किंवा ‘आयक्लाउड’ खाते हॅक अथवा संक्रमित झाल्याचे बनावट पॉप-अप संदेश पाठवले जात. त्यानंतर तांत्रिक अडचण दूर करण्याच्या बहाण्याने पीडितांकडून गिफ्ट कार्ड, झेल्ले, पेपाल आणि क्रिप्टोकरन्सीद्वारे पैसे उकळले जात होते.

पोलिसांनी या प्रकरणातील डिजिटल उपकरणांची तपासणी सुरू केली असून कॉल सेंटरच्या माध्यमातून किती नागरिकांशी संपर्क साधण्यात आला आणि किती रकमेची फसवणूक करण्यात आली, याचा तपास केला जात आहे. आरोपी परदेशी नागरिकांना लक्ष्य करण्यासाठी विविध बनावट ओळखी आणि तांत्रिक पद्धतींचा वापर करत असल्याचा संशय आहे. पुढील तपास सायबर गुन्हे शाखेकडून सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

काय सापडले?

संगणक साहित्य

९ लॅपटॉप जप्त

९ मोबाईल फोन ताब्यात

टीपी-लिंक राऊटर आणि हेडसेट जप्त

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Iran Secret Talks: अमेरिका आणि इराण यांच्यात 3 तास सिक्रेट मीटिंग, डोनाल्ड ट्रम्प यांचा तेहरानला थेट आणि खणखणीत इशारा; म्हणाले, 'एक मार्ग विनाशाचा तर...'

Goa Politcs: काँग्रेसने 'गोवा रक्षण यात्रा' नव्हे, 'आमदार राखण यात्रा' काढावी; 'आप'चा खोचक सल्ला, पक्षांतरांवरून निशाणा

Goa Politics: 'गोवा रक्षण यात्रेने फरक पडणार नाही'; 2027नंतरही भाजपचेच सरकार येणार, विश्वजीत राणेंचा दावा

Small Savings Schemes: गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी! PPF, सुकन्या आणि किसान विकास पत्रच्या व्याजदरांवर 30 सप्टेंबरला मोठा निर्णय; तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

खरी कुजबुज: राणे म्हणतात, मुख्यमंत्री मास्टरस्ट्रोक खेळणार!

SCROLL FOR NEXT