Rakhi For Soldier Dainik Gomantak
गोवा

Rakhi For Soldier: एक राखी जवानांसाठी!

राज्यपाल आर्लेकर : जिमखाना पणजी येथे कार्यक्रम

दैनिक गोमन्तक

चैतन्य प्रतिष्ठान गोवा या संस्थेतर्फे मागील 9 वर्षांपासून ‘एक राखी सैनिकांसाठी’ हा उपक्रम राबविण्यात येतो. सीमेवर तैनात असलेल्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा यामागचा मुख्य हेतू आहे.

गोव्यातील नागरिक व विद्यार्थ्यांकडून जवानांसाठी मोठ्या प्रमाणात राख्या याव्यात, असे आवाहन चैतन्य प्रतिष्ठान गोवाचे संचालक तथा बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी केले.

ते कृष्णदास शामा मध्यवर्ती वाचनालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी अनघा आर्लेकर उपस्थित होत्या.

दरम्यान, आर्लेकर म्हणाले, गोव्यातून आलेल्या सर्व राख्या सोमवार, २१ ऑगस्ट रोजी जवानांना सुपुर्द केल्या जातील.

त्यासाठी पणजीतील जिमखाना येथे सायंकाळी ४.३० वा. विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे उपस्थित राहतील तर अध्यक्षस्थान उद्योजक मनोज काकुलो भूषवतील.

येथे पाठवा राख्या

ज्या व्यक्तींना सैनिकांना राख्या पाठवायच्या असतील त्यांनी राज्यभरातील आपल्या जवळच्या केंद्रात 20 ऑगस्टपूर्वी राख्या द्याव्यात. राखी जमा करण्याची ठिकाणे : पणजी - बॅंझ शोरूम, फोंडा - विश्‍व हिंदू परिषद कार्यालय, मडगाव - माया बुक स्टॉल, म्हापसा - बॅंझ शोरूम, डिचोली : दीनदयाळ नागरी सहकारी संस्था, मुळगाव - वास्को गॅस एजन्सी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT