Goa Government  Scheme
Goa Government SchemeDainik Gomantak

Goa Government Scheme: ‘पीएमएफएमई’अंतर्गत स्वयंसाहाय्य गटांना निधी वितरण

पावसाळी अधिवेशनाच्या लेखी उत्तरात ही माहिती पुढे आली आहे.
Published on

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रम (पीएमएफएमई) या एकछत्री योजनेद्वारे राज्यात 441 स्वयंसाहाय्य गटांना 1 कोटी 71 लाख भांडवली निधी म्हणून वितरण करण्यात आले आहेत. पावसाळी अधिवेशनाच्या लेखी उत्तरात ही माहिती पुढे आली आहे.

Goa Government  Scheme
Flag Hoisting मंत्र्यांसाठी ध्वजारोहण सोहळ्याच्या वेळेत बदल!

‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत केंद्र सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयातर्फे ही योजना राबविली गेली आहे. केंद्र सरकारसाठी उद्योग, व्यापार आणि वाणिज्य (डीआयटीसी) ही राज्य नोडल एजन्सी (एसएनए) म्हणून काम करीत आहे.

ग्रामीण भागातील घटकाचा विकास केंद्रित करून ही योजना राबविली जात आहे. ग्रामीण भागातील स्वयंसाहाय्यासाठी गटांना मदत करून त्यांना आत्मनिर्भर बनविले जात आहे. सध्या राज्यातील 524 बचत गट (एसएचजी) सदस्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

Goa Government  Scheme
Banastarim Bridge Accident: लोकांना पोलिसांचा धाक उरला नाही; दिलीप प्रभुदेसाई

पीएमएफएमई अंतर्गत भांडवली निधीची रक्कम १ कोटी ७२ लाख २८ हजार ४५० रुपयांचे वाटप झाले असून, आणखी 210 अर्ज प्रक्रियेत आहेत.

४११ स्वयंसाहाय्य गटांना लाभ

‘एक जिल्हा एक उत्पादन’ म्हणून बचत गट सदस्यांसाठी सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ मिळाला आहे. राज्यातील उत्तर गोवा जिल्ह्यात ३४३ स्वयंसाहाय्य गट, तर ६८ दक्षिण गोव्यातील स्वयंसाहाय्य गटांचा त्यात समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com