Deputy Chief Minister Babu Ajgaonkar Dainik Gomantak
गोवा

"पेडणे मतदारसंघात अमली पदार्थ विकणारा उमेदवार मोकाट"

पैसा कमवण्यासाठी एक ड्रग्स विकणारा आणि बॉंनसर पुरवठा कारणारा उमेदवार सध्या पेडणे(Pernem) मतदार संघात फिरत आहे; बाबू आजगावकर

दैनिक गोमन्तक

मोरजी: पावसात अनेक प्रकारची अळमी उगवतात तश्या पद्धतीची निवडणूक लढवण्यासाठी आणि त्यातून पैसा कमवण्यासाठी एक ड्रग्स विकणारा आणि बॉंनसर पुरवठा कारणारा उमेदवार सध्या पेडणे(Pernem) मतदार संघात फिरत आहे त्याच्यापासूनजनतेने सावध राहावे व पाच वर्षात कुठे होतात आणि या पूर्वी मतदार संघात काय केले याचा जाब त्या उमेदवाराला विचारावा (Goa Politics) असे आवाहन उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Deputy Chief Minister Babu Ajgaonkar) यांनी वझरी येथे धाल्याचा मांड आणि गणपती विसर्जन प्लेट फॉर्म बांधकाम शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते.

यावेळी जिल्हा सदस्य सीमा खडपे ,वझरी सरपंच करुणा नाईक, उपसरपंच स्मिता कलगुटकर, पंच सुदाम परब ,अशोक कामत, हर्षा परब, नम्रता नाईक, आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी पुढे बोलताना पुढील पाच वर्षात प्रत्येक घरात किमान एक नोकरी मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न असतील त्यासाठी पुन्हा एकदा आम्हाला संधी देण्याची मागणी केली.

वझरीसाठी बाबूने काय दिले ?

वझरी साठी बाबू ने काय दिले यांची माहिती गावातील जाणकारांकडून युवा पिढीने जाणून घ्यावी, वझरी पूल, थर्मास पूल, महादेव मंदिर ते मुख्य रस्ता केला. आपण या गावात आणि मतदार संघात येण्यापूर्वी गावात रस्त्ये नव्हते, वीज नव्हती, पाण्याची सोय नव्हती, या सोयी सुविधा पुरवल्या आता आपण नोकऱ्या घराघरात पोचवण्यासाठी पुढील आमदारकी महत्वाची ठरणार असल्याचे आजगावकर म्हणाले.

पाठीत खंजीर खुपसला

वझरीच्या एका बाईला पंच ते सरपंच केले, नंतर तिचा सत्कार करण्यासाठी पैसा खर्च केला त्याच्या नवऱ्या सरकारी नोकरी मिळवून दिली, त्याच बाईने पाठीत खंजीर खुपसून आता ती बाई ड्रग्स विकणाऱ्या उमेद्वारासोबत प्रचार करत आहे, आपल्यावर टीका करत आहे. तीच बाई ज्यावेळी आपण मंत्री उपमुख्यमंत्री झालो तेव्हा पेडणे येथे पत्रकार परीषद घेवून बाबू आजगावकर यांनी कितीही पक्ष बदले, कोणत्याही सरकारात समील झाले तरीही आम्ही त्यांच्याच सोबत असणार असे जाहीर करणाऱ्या त्या बाईचा डाव गावातील नागरिकांनी ओळखला म्हणूनच पूर्ण गावातील 90 टक्के युवकांनी नागरिकांनी आपल्याला पूर्ण पाठींबा देवून वझरी येथे शक्ती प्रदर्शन केले त्यातून तरी त्या बाईने आता बाेध घ्यावा असा टोला मंत्री आजगावकर यांनी केला.

महिलांचा सन्मान करणारा नेता ; सीमा खडपे

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हे सदैव विकासाचा ध्यास घेतलेले नेते आहेत, शिवाय महिलांचा सन्मान करणारे आहेत. आगामी निवडणुकीत त्याना पुन्हा संधी देवून बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी संघटीत होवून काम करण्याचे आवाहन केले.

वझरीचे जेष्ठ कार्यकर्त्ये अशोक कामत यांनी बोलताना बाबू आजगावकर पाच वर्षातून एकदाच आमच्याकडे मते मागतात आणि ते मात्र आम्हाला पाच वर्षे सतत विकासाच्या नावाने विविध उपक्रमातून रोजगार उद्योग धंद्यातून काहीना काही देत असतात. असे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

SCROLL FOR NEXT