Arvind Kejriwal Dainik Gomantak
गोवा

Arvind Kejriwal: 2027 मध्ये गोव्यात 'आम आदमी'चे सरकार; केजरीवालांना आत्मविश्वास, काँग्रेसवर भाजपला मदत केल्याचा आरोप

Arvind Kejriwal Goa Visit: आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल तीन दिवसीय गोवा दौऱ्यावर आले आहेत.

Pramod Yadav

पणजी: येत्या २०२७ च्या निवडणुकीत गोव्यात आम आदमी पक्ष सरकार स्थापन करणार, असा विश्वास पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे. केजरीवाल तीन दिवसीय गोवा दौऱ्यासाठी राज्यात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी भाजपसह काँग्रेसवर देखील टीकास्त्र सोडले.

अरविंद केजरीवाल शुक्रवारी रात्री गोव्यात दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेत्या आतिषी देखील उपस्थित होत्या. गेल्या १३ वर्षापासून गोव्यात भाजप सरकार आहे. काँग्रेसच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष समर्थनात भाजप सत्तेत आहे. भाजप – काँग्रेसच्या सरकारने गोव्याला केवळ आणि केवळ गुंडाराज दिले आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला.

केजरीवाल यांनी यावेळी रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ल्याचा उल्लेख केला. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली असल्याचे केजरीवाल म्हणाले. राज्यात अवैध बांधकाम, खाण आणि मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप त्यांनी केला.

"याशिवाय हिंसाचार, राज्य पुरस्कृत गुंडाराज, खड्डेमय रस्ते, विस्कळीत वीज पुरवठा, बेरोजगारी वाढली आहे. राज्यातील लोक भीती खाली जगत आहेत. भाजप – काँग्रेसच्या गुंडाराज विरोधात आपचे कार्यकर्ते – नेते आवाज उठवत आहेत", असे केजरीवाल म्हणाले.

केजरीवाल यांनी केलेल्या आरोपांना काँग्रेसने जोरदार प्रतित्युत्तर दिले आहे. "केजरीवाल भाजपच्या इशाऱ्यावर नाचत आहेत, असा हल्लाबोल काँग्रेस नेते गिरीश चोडणकरांनी केला. भाजपच्या फायद्यासाठी ते काँग्रेसला कमजोर करण्याचा प्रयत्न करतायेत. दिल्लीत लिहलेली स्क्रिप्ट गोव्यात सादर केली जात आहे. त्यांचा भाजपला विरोध असता तर त्यांनी काँग्रेसवर हल्ला केला नसता", असे चोडणकर म्हणाले.

गोवा काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी देखील केजरीवाल भाजपच्या इशाऱ्यावर चालत असल्याची टीका केली. काँग्रेसवर आरोप केल्याने त्याचा थेट भाजपला फायदा होणार आहे. दिल्लीत लिहलेल्या या नाटकाला गोमंतकीय बळी पडणार नाहीत. आपची हालचाली स्पष्ट बोलत आहेत. ते भाजपचे छुपे साथीदार आहेत का? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.

काँग्रेसच्या सहप्रभारी अंजली निंबाळकर यांनी केजरीवाल, अण्णा हजारे यांच्यासह भाजपच्या बैठकीत बसल्याचा फोटो शेअर केला आहे. "केजरीवाल हा फोटो तुम्हाला आठवतो का? गोमंतकीयांना ठरवू द्या कोण कोणासोबत युतीत आहे? गोव्यात आता तुमचा कोणताही स्टंट कामाला येणार नाही. दिल्लीत लोकांनी तुम्हाला दाखवून दिले आहे आता पंजाब आणि गोव्याची वेळ आहे", असे निंबाळकर यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT