Monkey-faced butterfly  Dainik Gomantak
गोवा

Apefly Butterfly: अद्भुत! गोव्यातील वांते गावात आढळले 'वानरमुखी फुलपाखरू'

Monkey-faced butterfly: आपल्‍या देशात आढळणारा एकमात्र एप म्हणजे हुल्लक गीबन, जो आसाम आणि अरुणाचलप्रदेशमध्ये आढळतो.

Sameer Panditrao

सत्तरी: सत्तरी तालुक्‍यातील वांते गावात वानरमुखी फुलपाखरू आढळून आले आहे. गोव्यात सहसा ते दृष्टीस पडत नाही. प्रतीक्षा नाईक यांच्या बागेत कडुनिंबाच्या पानावर या फुलपाखराचे चार कोशीत आढळले.

अगदी हाताच्या बोटांपेक्षा लहान असलेल्या या कोशीतकडे बघितल्यावर एखाद्या वानरासारखा हुबेहूब चेहरा दिसतो. त्‍यामुळे प्राणिशास्त्राने त्याचे नामकरण ‘एपफ्ल्याय’ फुलपाखरू असे केले आहे. निसर्ग आपल्या चमत्कृतीने जसा सर्वसामान्यांना आकर्षित करत असतो, तसाच तो प्राणिशास्त्रज्ञांची वैज्ञानिक दृष्टी जागृत करत असतो. ‘एपफ्ल्याय’ हे फुलपाखरू म्हणजे निसर्गाचा अद्‌भुत चमत्कारच होय.

Goa orange tiger butterfly

आपल्‍या देशात आढळणारा एकमात्र एप म्हणजे हुल्लक गीबन, जो आसाम आणि अरुणाचलप्रदेशमध्ये आढळतो. इतर फुलपाखरांपेक्षा या फुलपाखराच्या अळ्या आणि कोशीतसुद्धा वेगळे आहेत.

या फुलपाखराच्या अळ्या मांसाहारी असतात. त्या मिलीबग आणि स्केल या जातीतील कीटक खाऊन जगतात. तर, त्याचा कोशीत पानाच्या खालच्या बाजूने नसून पानाच्या वरच्या बाजूनेच चिकटवला जातो. फुलपाखरांचे वैविध्यपूर्ण जग हे असे प्रेरणादायी असेच आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

चुलीत पेटवली आग, दोन सिलिंडरचा मोठा स्फोट, लाखोंची मालमत्ता जळून खाक; Watch Video

Mayem: ट्रान्सफॉर्मरने पेट घेतला, 10 तास वीज गायब; मये परिसरात दिवसभर लोकांचे हाल

Anmod Ghat: ..पुन्हा निर्णय मागे! अनमोड घाट 15 सप्टेंबरपासून होणार खुला; वाढीव कालावधीस कडाडून विरोध

Altinho: आल्‍तिनोतील सरकारी निवासस्‍थानांचे कार्यालयांमध्‍ये रूपांतरण! CCTV, सुरक्षा रक्षक नसल्‍याने प्रश्‍‍न ऐरणीवर; कुटुंबीयांत धास्‍ती

Goa Mining: खाण लीजमधील जमीनमालकांना 'सरकार'चाच आधार! कायद्यानुसार मोबदला देण्‍याची तरतूद; आधारभूत किंमतीचा पर्याय

SCROLL FOR NEXT