<div class="paragraphs"><p>Campal Playground</p></div>

Campal Playground

 

Dainik Gomantak 

गोवा

कांपाल मैदानावर खेळणे सोडाच, चालणेही मुश्‍‍कील!

दैनिक गोमन्तक

पणजी: येथील कांपाल मैदानाची पार दुर्दशा झाली असून क्रिकेट तर सोडाच तेथून चालत जाणेही लोकांना कठीण होऊन बसले आहे. क्रिकेटच्‍या सरावासाठी बसवलेले नेट (जाळे) आणि खेळपट्टी नामशेष होण्‍याच्‍या मार्गावर आहे. नुकताच या मैदानावर पार पडलेल्‍या विज्ञान महोत्‍सवाचे सामानही तेथे तसेच पडून आहे.

पणजी (Panjim) परिसरातील लोक आणि कांपाल मैदान यांचे वर्षांनुवर्षांचे ऋणानुबंध आहेत. भल्‍या पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत हे मैदान त्‍यांच्‍या जीवनाचा अविभाज्‍य घटक बनलेय. पण अलीकडच्‍या काही वर्षांत या मैदानाची पुरती वाट लागलेली आहे. त्‍यामुळे सकाळी तेथे चालायला येणाऱ्या लोकांची संख्‍या खूपच कमी झाली आहे. सकाळ-संध्‍याकाळ क्रिकेटचा सराव करणारी मुलेही दिसत नाहीत. कारण नेट तुटून पडले आहे. खेळपट्टीची व्‍यवस्‍था दयनीय झालेली आहे. झाडेझुडपे वाढल्‍यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचा सुळसुळाट झालेला आहे. सर्वत्र दगडधोंडे आणि चिखलाचे साम्राज्‍य पसरलेले आहे. साहजिकच नको ते क्रिकेट आणि नको ते चालणे असे म्‍हणण्‍याची वेळ लोकांवर आलेली आहे.

कांपाल मैदानाची (Campal Playground) झालेली दुर्दशा आणि त्‍यामुळे खेळाडू तसेच लोकांची होणारी गैरसोय आठवडाभरात दूर करण्‍यात येईल. लांबलेला पाऊस (Rain), त्‍यामुळे मैदानावर निर्माण झालेले चिखलाचे साम्राज्‍य, वाढलेली झाडेझुडपे आणि नुकताच तेथे पार पडलेला विज्ञान महोत्‍सव यामुळे साफसफाईचे काम रखडले. महोत्‍सवासाठी तात्‍पुरती व्‍यवस्‍था केली होती. आता लवकरच हा परिसर स्‍वच्‍छ करण्‍यात येईल. क्रिकेट (Cricket) नेट, खेळपट्टीचीही दुरुस्‍ती केली जाईल.

- व्‍ही. एम. प्रभुदेसाई, कार्यकारी संचालक, गोवा क्रीडा प्राधीकरण

विज्ञान महोत्‍सवामुळे परिसर विद्रूप

कांपाल मैदानावर नुकताच आंतरराष्‍ट्रीय विज्ञान महोत्‍सव झाला होता. तीन दिवस चाललेल्‍या महोत्‍सवासाठी शेकडो लोक तेथे आले होते. आता महोत्‍सव संपला पण तेथे सर्वत्र सामान विखरून पडले आहेच शिवाय परिसरही विद्रूप झालेला आहे. खाद्यपदार्थ, पत्रावेळी तेथेच फेकून देण्‍यात आल्‍या आहेत. त्‍यामुळे या परिसराला ओंगळवाणे स्‍वरूप प्राप्‍त झाले असून तेथे जाणेही कंटाळवाणे ठरत आहे. संबंधित खात्‍याने याची दखल घेऊन हा परिसर आणि मैदान (Playground) त्‍वरित स्‍वच्‍छ करावे, अशी मागणी करण्‍यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

OCI चे भवितव्य आता गृहमंत्री अमित शहांच्या हाती, CM सावंत म्हणतात... 'आम्ही कोणाला फसविले नाही'

India Russia Relations: भारत रशिया यांच्यात होणार मोठा करार; पुतिन सरकारच्या सहकार्याने बनवला ‘हा’ प्लॅन

Swati Maliwal Assault Case: 'भाजपने षड्यंत्राचा भाग म्हणून स्वाती मालीवाल यांना...', 'आप' नेत्या आतिशी यांचा घणाघात

Mumbai Goa Highway: कधी सुरू होणार मुंबई-गोवा महामार्ग? उज्वल निकम यांच्या प्रचार सभेत गडकरींनी दिली माहिती

Delhi Excise Policy Case: दिल्ली कथित अबकारी धोरण घोटाळा; 'केजरीवाल', 'आप' आरोपी

SCROLL FOR NEXT