वेर्णा पोलिसांनी अन्वर शेख हत्या प्रकरणाचा 72 तासांत केला उलगडा

 

Dainik Gomantak

गोवा

वेर्णा पोलिसांनी अन्वर शेख हत्या प्रकरणाचा 72 तासांत केला उलगडा

साकवाळ येथील रहिवाशी अन्वर शेख याला जबर मारहाण करून त्याला तो राहत असलेल्या ठिकाणी फेकून दिले

दैनिक गोमन्तक

वास्को: वेर्णा पोलिसांनी अन्वर शेख हत्या प्रकरणाची 72 तासांत उलगडा लावला.आरोपी अस्लम खान (54, रा. बायना) याला अटक करण्यात आली. पीडितेच्या चेहऱ्यावर हातोड्याने वार करून घटनास्थळावरून पळून गेल्याची कबुली आरोपीने दिली. आरोपी अस्लम खान (54) याला त्याच्या निवासस्थानावरून अटक केली. आरोपी खान याने अन्वर शेख यांचा खून केल्याची कबूली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

वेर्णा पोलिस स्थानकाचे निरीक्षक प्रशल देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार साकवाळ येथील रहिवाशी अन्वर शेख याला जबर मारहाण करून त्याला तो राहत असलेल्या ठिकाणी फेकून दिले व आरोपीने त्याची स्कुटर घेऊन पलायन केले.सदर प्रकरण वेर्णा पोलिसांनी खूनाचे असल्याचे नमूद केले होते. नंतर पोलिसांनी संशयिताचा शोधकार्य सुरु केले असता अखेर काल बुधवार संशयित आरोपी बायणा वास्को येथील रहीवाशी अश्लम खान याला मोठ्या शीताफीने पोलिसांनी सापळा रचून अटक केली. अखेर त्याने अन्वर शेख याचा खून केल्याची कबुली दिली.

सदर आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी मुरगावचे प्रभारी पोलिस उपअधिक्षक धर्मेश आंगले यांच्या मार्गदर्शनाखाली मडगाव पोलिस निरीक्षक जितेंद्र नाईक, वास्को पोलीस निरीक्षक नीलेश राणे, वेर्णा पोलिस निरीक्षक प्रशल देखाई यांनी शोधकार्य सुरु सुरू करुन आरोपीच्या मुसक्या आवळल्या.आरोपी अस्लम खान याच्याकडे कसून चौकशी करण्यात आली. आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली. पूर्वीच्या वैमनस्यातून त्याने हा गुन्हा केल्याचे आतापर्यंत उघड झाले आहे.

चौकशी दरम्यान, आरोपीने असे सांगितले आहे की त्याने मयत व्यक्तीवर हातोड्याने वार केले आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच्या स्कूटरसह आणि मोबाईल फोन घेऊन घटनास्थळावरून पळ काढला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amanda Wellington: "मला भारताकडून क्रिकेट खेळायचंय..." दोन वेळच्या वर्ल्ड कप विजेती ऑस्ट्रेलियन खेळाडूचं विधान चर्चेत VIDEO

Women Heart Attack: थकवा, श्वास घेण्यास त्रास? सामान्य वाटणारी 'ही' लक्षणे हृदयविकाराची पूर्वसूचना, वेळीच उपचार घ्या

Writing History: माती, दगड आणि हाडे अशा वस्तूंवर चिन्हे कोरून, खुणांद्वारे विकसीत झालेली 'लेखनकला'

Rohit Sharma New Look: 'मुंबईच्या राजा'चा फिटनेस पाहून चाहते थक्क! तरुणांनाही लाजवेल असा रोहितचा नवा लूक!

Genetic Ancestry: पहिल्या आधुनिक मानवांचे वंशज सुमारे 60000 ते 40000 इ.स.पू. भारतात पोहोचले; जात आणि वंशपरंपरा

SCROLL FOR NEXT