पंतप्रधानांनी गोवा मुख्यमंत्री आणि इतर भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी करावी

तप्रधान नरेंद्र मोदी यांना जर त्यांची 'ना खाऊंगा, ना खाने दूंगा' ही घोषणा फोल आशा ठरवायची नसेल तर त्यांनी गोव्यातील 'नोकरी घोटाळ्यात' गुंतलेल्या मुख्यमंत्री आणि इतर सर्व भ्रष्ट मंत्र्यांना काढून टाकावे
पंतप्रधानांनी मुख्यमंत्री आणि इतर भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी करावी: विजय सरदेसाई

पंतप्रधानांनी मुख्यमंत्री आणि इतर भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी करावी: विजय सरदेसाई

Dainik Gomantak

Published on
Updated on

मडगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना जर त्यांची 'ना खाऊंगा, ना खाने दूंगा' ही घोषणा फोल आशा ठरवायची नसेल तर त्यांनी गोव्यातील (Goa) 'नोकरी घोटाळ्यात' (Job Scam) गुंतलेल्या मुख्यमंत्री (CM Pramod Sawant) आणि इतर सर्व भ्रष्ट मंत्र्यांना काढून टाकावे आणि त्यांच्यावर खटला दाखल करावा अशी मागणी गोवा फॉरवर्डचे (Goa Forward Party) अध्यक्ष विजय सरदेसाई (Vijai Sardesai) यांनी केली आहे. विजय सरदेसाई यांनी सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गोव्याच्या भ्रष्ट मंत्रिमंडळावर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 डिसेंबरला आपल्या गोवा दौऱ्यापूर्वी या मंत्री, आमदार आणि नोकरी विकणाऱ्या एजंटांची पक्षातून हकालपट्टी करावी असेही त्यांणी म्हटले आहे.

<div class="paragraphs"><p>पंतप्रधानांनी मुख्यमंत्री आणि इतर भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी करावी: विजय सरदेसाई</p></div>
मुरगाव बंदरातील धक्क्याच्या खाजगीकरणाला कामगार संघटनेचा विरोध

“ नोकरीसाठी तरुणांना पैसे द्यावे लागत आहेत. आम्ही आमच्या तरुणांना या परिस्थितीतून मुक्त केले पाहिजे. नोकरीसाठी या तरुणांकडून पैसे घेतलेल्या पक्षाच्या सदस्यांवर कारवाई करून पंतप्रधानांनी आपली घोषणा अबाधित ठेवावी आणि गोव्याला अशा भ्रष्टारातून बाहेर येण्यास मदत करावी.’’ असे ते पुढे म्हणाले. “पैसा करण्यासाठीच भाजपने दहा हजार नोकऱ्या जाहीर केल्या होत्या. भ्रष्ट मंत्र्यांच्या लोभी दृष्टिकोनामुळे पात्र उमेदवारांनी त्रास का सहन करावा’’. असा प्रश्न सरदेसाई यांनी केला आहे. ते म्हणाले की, सत्ताधारी भाजप आमदारांनी जॉब फॉर सेल घोटाळ्यावरून भाजप सरकारचा पर्दाफाश केला आहे आणि विरोधकांच्या आरोपांना आणि आवाजाला आधार दिला आहे.

<div class="paragraphs"><p>पंतप्रधानांनी मुख्यमंत्री आणि इतर भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी करावी: विजय सरदेसाई</p></div>
काँग्रेस नेते संकल्प आमोणकर यांच्याविरोधात एफआयआर दाखल

परीक्षेत फेरफार करण्यासाठी भ्रष्ट भाजपची आज्ञा न मानण्याचा इशारा सरदेसाई यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना दिला आहे. "भाजपचा लवकरच पराभव होईल आणि मग या कर्मचाऱ्यांना खटल्यांना सामोरे जावे लागेल, हे या अधिकाऱ्यांनी समजून घेतले पाहिजे." असे ते म्हणाले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत 'मुख्यमंत्री रोजगार योजना' या नावाने योजना सुरू करू शकतात, आणि बिनव्याजी कर्ज मंजूर करून लाच घेऊ शकतात असेही लोक बोलायला लागले आहेत. लोक या भ्रष्ट भाजपला नक्कीच घरी पाठवतील पण त्याआधी पंतप्रधानांनी कारवाई करावी, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Shashank Narvekar Mental Healt
Colvale Jail Holiday Home
Drug Network From Jail
 Supreme Court Stray Dog Directions
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com