Goa CM financial assistance for refilling of lpg cylinder scheme 2023 Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील अंत्योदय लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, LPG भरण्यासाठी मिळणार पैसे, 7 ऑगस्टपूर्वी करा 'हे' महत्वाचे काम

मुख्यमंत्री आर्थिक सहाय्यता LPG सिलिंडर रिफिल योजना 2023 अंतर्गत लाभार्थ्यांना 275 रूपयांची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

Pramod Yadav

Goa CM financial assistance for refilling of lpg cylinder scheme 2023

राज्यातील सर्व अंत्योदय अन्न योजना (AAY) लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी असून, LPG गॅस भरण्यासाठी आर्थिक लाभार्थ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे. मुख्यमंत्री आर्थिक सहाय्यता LPG सिलिंडर रिफिल योजना 2023 अंतर्गत लाभार्थ्यांना 275 रूपयांची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. पण, त्यासाठी लाभार्थ्यांना महत्वाचे काम करावे लागणार आहे.

आर्थिक मदत मिळण्यासाठी अंत्योदय अन्न योजना (AAY) लाभार्थ्यांना बँक खाते आणि मोबाईल तपशीलांची सत्यता पडताळावी लागणार आहे.

नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागाने राज्यातील सर्व अंत्योदय अन्न योजना (AAY) लाभार्थ्यांना 7 ऑगस्ट 2023 रोजी किंवा त्यापूर्वी त्यांच्या संबंधित तालुका कार्यालयांद्वारे त्यांचे बँक खाते आणि मोबाईल तपशीलांची सत्यता पडताळण्याचे निर्देश दिले आहेत. आर्थिक मदत थेट कुटुंब प्रमुखाच्या खात्यात जमा केली जाणार आहे.

लाभार्थ्यांना पैसे थेट बँक खात्यात मिळावे यासाठी तपशीलांची सत्यता पडताळण्याचे आवाहन केले आहे.

नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागाने राज्यातील सर्व अंत्योदय अन्न योजना (AAY) लाभार्थ्यांना 7 ऑगस्ट 2023 रोजी किंवा त्यापूर्वी हे काम करणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT