Goa Govt Locker Dainik Gomantak
गोवा

Goa Govt Locker: 32 वर्षानंतर उघडली तिजोरी अन् गोवा सरकारला सापडले घबाड; सोने, दागिने, जुनी नाणी यांचा समावेश

Goa Govt Locker: मिळालेल्या दुर्मिळ वस्तू संग्रहालयात ठेवल्या जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

Pramod Yadav

Goa Govt Locker

गोवा सरकारच्या जुन्या तिजोरीत घबाड सापडले असून, यात 2.234 किलो सोन्याचा वस्तू, दागिने, जुनी नाणी यांचा समावेश आहे.

मागील 32 वर्षापासून हे सरकारी तिजोरी उघडण्यात आली नव्हती, मिळालेल्या दुर्मिळ वस्तू संग्रहालयात ठेवल्या जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याबाबत माहिती दिली. जुन्या सचिवालयामागील फझेंडा इमारतीत जुने लेखा संचालनालयाचे कार्यालय होते.

येथील एका तिजोरीत दुर्मिळ वस्तू ठेवण्यात आल्या होता. 1992 साली ही तिजोरी उघडण्यात आली होती त्यानंतर तब्बल 32 वर्षानंतर ही तिजोरी उघडण्यात आली त्यावेळी तिजोरीत दुर्मिळ आणि मैल्यवान वस्तू सापडल्या असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

तिजोरीत काय - काय सापडले?

तिजोरीत पाच हजार दुर्मिळ नाणी, 307 तांब्याची नाणी, अरेबिक कलाकुसर असलेली 814 नाणी, 1,746 अरेबिक नाणी, 1,026 तांब्याची, क्वीन व्हिक्टोरिया आणि किंग विल्यम यांची छाप असलेली 320 दुर्मिळ नाणी, दुर्मिळ चलनी नोटा, सोन्याचे तुकडे , दुर्मिळ सुवर्णालंकार यासह घरातील दुर्मिळ भांडी आणि इतर वस्तूंचा समावेश आहे.

मिळालेल्या दुर्मिळ वस्तू संग्रहालयात ठेवल्या जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kishtwar Cloud Burst: 33 मृत्यू, 200 हून अधिकजण बेपत्ता! ढगफुटीने किश्तवाडमध्ये हाहाकार, बचावकार्य सुरु; PM मोदींनी व्यक्त केल्या संवेदना

कोमुनिदादींच्या जमिनीवरील बेकायदा घरे कायदेशीर करण्याच्या विधेयकाला विरोध; २४ ऑगस्टला खास बैठक

Viral Video: अतिथी देवो भव… पण पाहुण्याची अशी बेइज्जती, व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क; नेटकऱ्यांनी घेतली मजा!

मुस्लिम राष्ट्रासाठी पाकिस्तानात हिंदू, ख्रिश्चन लोकांवर अत्याचार करण्यात आले; मुख्यमंत्री प्रमोद सावंत

IND vs PAK: ‘इतकी धुलाई करतील की...' पाकिस्तानी दिग्गजाला भारतीय बॅटर्स धास्ती; आशिया कपमधील भारत-पाक सामन्यावर मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT