Panaji Police Sation Dainik Gomantak
गोवा

Panaji: पणजीत दोन संशयास्पद कार; ATS ने पोलिसांना अलर्ट केल्यानंतर गाड्या जप्त, तपास सुरू

प्रथमदर्शनी गाड्यांवरील क्रमांक बनावट असल्याचे समोर आले आहे.

Pramod Yadav

पणजीत विविध ठिकाणी पार्क केलेल्या दोन संशयास्पद कार जप्त करण्यात आल्या आहेत. दहशतवादविरोधी पथकाने अलर्ट केल्यानंतर पणजी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दोन्ही कारवर एकच नोंदणी क्रमांक असून, प्रथमदर्शनी गाड्यांवरील क्रमांक बनावट असल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पणजीत दोन कार स्वतंत्र ठिकाणी उभ्या असलेल्या दहशतवादविरोधी पथकाच्या निदर्शनास आल्या. ATS पथकाने याबाबत तात्काळ पणजी पोलिसांना कळवले आणि पणजी पोलिसांनी दोन्ही गाड्या ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

कारवर MP 04 CW 9008 असा क्रमांक असून, त्याचा परवाना मध्य प्रदेशातील असल्याचे समजते. मात्र, नोंदणी क्रमांक बनावट असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.

यातील एका गाडीचा चेसिस नंबर काढला आहे पण दुसऱ्या गाडीचा चेसिस नंबर तसाच आहे.

पणजी पोलिसांनी कारच्या मालकीचे तपशील मागवले आहेत आणि या प्रकरणाचा पोलीस सध्या कसून तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT