गोवा

Morjim: भेंडाळे येथे अमलीपदार्थ विरोधी जनजागृती; "कळत-नकळत गुन्ह्यात अडकू नका", पोलिसांचा विद्यार्थ्यांना सल्ला

Anti Drug Awareness: अमली पदार्थ जवळ बाळगणे, त्याचे सेवन करणे, उत्पन्न घेणे, विकत घेणे व विकणे तसेच वाहतूक करणे हा कायद्याने गुन्हा आहे.

Sameer Amunekar

मोरजी: अमली पदार्थ जवळ बाळगणे, त्याचे सेवन करणे, उत्पन्न घेणे, विकत घेणे व विकणे तसेच वाहतूक करणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे कळत-नकळत अशा गुन्ह्यात अडकण्यापासून विद्यार्थ्यांनी स्वतःला रोखले पाहिजे, असे मार्गदर्शन पोलिस अधिकारी शशांक परब यांनी विद्यार्थ्यांना केले.

पेडणे तालुक्यातील वझरी ग्रामपंचायत क्षेत्रातील भेंडाळे येथील शारदा उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत मोपा पोलिस ठाण्यातील पोलिसांकडून अमलीपदार्थ विरोधी जनजागृती करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

तसेच अमलीपदार्थ विरोधी कायद्याबाबत माहिती करून दिली. यावेळी अमलीपदार्थ विरोधी सेलचे पोलिस अधिकारी शशांक परब, पोलिस शिपाई निकिता म्हापसेकर, सुचिता नाईक व प्रा. गजानन मराठे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सुप्रिया खोत यांनी तर आभारप्रदर्शन सायली परब यांनी केले.

नेहमीच सावध राहा!

स्वत: व आपल्या आजूबाजूच्या मित्रपरिवाराला यासंदर्भात जागरूक केले पाहिजे. या गुन्ह्यांसाठी कायद्याने कडक शिक्षेची तरतूद आहे. अमलीपदार्थ सेवन हे माणसाच्या मानसिक स्वास्थ्यासाठी हानिकारक असून त्याच्या सेवनामुळे आपल्या हातून अपराध किंवा गुन्हा घडू शकतो. या वयात आपण अशा गोष्टींपासून नेहमीच सावध राहायला पाहिजे, असे आवाहन परब यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Zuarinagar: हृदयद्रावक! फ्रीजखाली गेलेला चेंडू काढताना बसला शॉक; झुआरीनगरातील चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Goa Theft: सावधान! गोव्यात चोरट्यांचा धुमाकूळ, बंद घरे होताहेत 'टार्गेट'; म्हापसा, कोलवा परिसरात दहशत

Rashi Bhavishya 1 September 2025: पैशाच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या,आत्मविश्वास उंचावेल; चांगल्या बातम्या मिळतील

Viral Video: 'तो' देवदूत बनून आला! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वासराला पाठीवर बसवून वाचवला जीव; पूरग्रस्त जम्मूतील हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल

Mental Health And Heart Disease: नैराश्य आणि ताणतणाव वाढवतात हृदयविकाराचा धोका; मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करणं ठरु शकतं जीवघेणं

SCROLL FOR NEXT