madgaon railway police station ACB Raid Dainik Gomantak
गोवा

Konkan Railway Raid: मडगाव रेल्वे पोलिस स्थानकावर भ्रष्टाचार विरोधी पथकाचा सापळा; दोन अधिकारी अडकले जाळ्यात

Konkan Railway ACB Raid: भ्रष्टाचार विरोधी पथकाच्या वतीने गुप्त पद्धतीने कोकण रेल्वेच्या मडगाव पोलिस स्थानकावर सापळा रचण्यात आला होता.

Pramod Yadav

मडगाव: भ्रष्टाचार विरोधी पथकाच्या (ACB) वतीने कोकण रेल्वेच्या मडगाव पोलिस स्थानकावर सापळा रचण्यात आला होता. एसीबीने दोन अधिकाऱ्यांना लाच घेतल्याप्रकरणी मंगळवारी (२२ एप्रिल) पहाटे ४.३० वाजता ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. भ्रष्टाचार विरोधी पथकाच्या वतीने गुप्त पद्धतीने ही कारवाई करण्यात आली.

भ्रष्टाचार विरोधी पथकाच्या (ACB) वतीने मिळालेल्या तक्रारीच्या आधारे सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास मडगाव रेल्वे पोलिस स्थानकावर सापळा रचला होता. या सापळ्यात मडगाव रेल्वे पोलिस स्थानकाचे दोन पोलिस अधिकारी फसल्याचे समोर आले आहे.

यामध्ये पोलिस निरीक्षक सुनील गुडलर आणि कॉन्स्टेबल हुसेन यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळतेय. अधिकाऱ्यांनी पैसे मागितल्याची त्यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे. सुमारे बारा तास ही कारवाई सुरु होती. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT