Crime news Dainik Gomantak
गोवा

त्रिनिदाद मार्टिन्स खुनात आणखी एकाचा हात?

मार्टिन्स यांच्या डोक्यावर लोखंडी दांड्याचा वार करून त्‍यांचा खून करण्‍यात आला होता

Priyanka Deshmukh

मडगाव: वार्का येथील त्रिनिदाद मार्टिन्स या 80 वर्षीय वृद्धाच्या खून प्रकरणात कोलवा पोलिसांनी त्याची मुलगी झुबेल (37) हिला अटक केली असली तरी या प्रकरणात आणखी एखाद्या व्यक्तीचा हात असावा असा दाट संशय कोलवा पोलिसांना आहे. त्यादृष्टीने त्‍यांनी तपास सुरू ठेवला आहे.

काल अटक करण्यात आलेल्या झुबेल हिला रात्री उशिरा न्यायालयासमोर हजर केले असता तिला सात दिवस पोलिस कोठडी देण्यात आल्‍याची माहिती तपास अधिकारी मेल्सन कुलासो यांनी दिली. या प्रकरणी जरी झुबेल हिला अटक केली असली तरी तिने अजून खुनाची कबुली दिलेली नाही.

मयत मार्टिन्स यांच्या डोक्यावर लोखंडी दांड्याचा वार करून त्‍यांचा खून करण्‍यात आला आहे. त्यांच्या तोंडावरही असंख्य वार करण्यात आले होते. ज्या प्रकारे हा हल्ला झालाय, त्‍याद्वारे हे काम एखाद्या पुरुषाने केल्याचा संशय पोलिसांना आहे. झुबेल हिने या अज्ञात आरोपीशी संगनमत करून हा खून करवून घेतला असावा असाही पोलिसांचा कयास आहे.

आपल्या मुलीला दूर ठेऊन स्वतः एकटेच घरात राहणाऱ्या मार्टिन्स यांचा घराच्या मालमत्तेवरून मुलगी झुबेल हिच्याशी वाद होता. त्यांनी आपले घर मुलीला न देता परस्पर एका आश्रमाला दान करण्‍याची तयारी केली होती. त्यामुळे त्यांच्यातील तणाव अधिकच वाढला होता. त्यातूनच हा खून झाला असावा असा कोलवा पोलिसांचा (Goa police) निष्कर्ष आहे. अधिक तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

No Bag School Goa: गोव्यात भरते ‘बिनदप्तरी शाळा’! कुडचडेच्या ‘सीटीएन’ शाळेचा उपक्रम; विद्यार्थी लुटतात आनंद

Shwetakshi Mishra: अभिमान! श्वेताक्षी मिश्रा यांना उत्तर धृवावर संशोधनाची संधी; ग्रीष्मकालीन तुकडीत सहभाग

Damu Naik: काही नेत्यांना ‘प्रसिद्धी स्टंट’ची सवय! दामूंचा भाजप आमदारांना घरचा आहेर; लोबोंवरही निशाणा

Vijai Sardesai: MPA ची दादागिरी, प्रदूषण वाढलेय! विजय सरदेसाईंचा आरोप; ‘जनता दरबार’मध्ये ऐकल्या समस्या

Goa Politics: खरी कुजबुज; पोलिसांचे फोन टॅपिंग?

SCROLL FOR NEXT