गोवा

ताळगावातील ख्रिस्ती धर्मगुरूचे हिंदू देवतांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, कायदेशीर कारवाईची मागणी

ख्रिस्ती धर्मगुरूच्या वक्तव्याचा हिंदू रक्षा महाआघाडीने तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

Pramod Yadav

ताळगाव येथील एका ख्रिस्ती धर्मगुरूने चर्चमध्ये संबोधित करताना हिंदू धर्मियांच्या देवांबद्दल आक्षेपार्ह उद्घगार काढले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. फादर बोलमॅक्स यांनी शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर आता हा दुसरा प्रकार समोर आला आहे. यावरून हिंदू संघटना आक्रमक झाल्या असून, त्यांनी कारवाईची मागणी केली आहे.

ख्रिस्ती धर्मगुरूच्या वक्तव्याचा हिंदू रक्षा महाआघाडीने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. जातीय विद्वेष निर्माण करणाऱ्या धर्मगुरूविरोधात कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी महाआघाडीने केली आहे.

पाद्रींकडून चर्चचे धार्मिक व्यासपीठ हिंदूविरोधी प्रचार करण्यासाठी वापरल्याबद्दल आर्चबिशपनी गोव्यातील हिंदू समाजाची जाहीर माफी मागावी. अशी भूमिका हिंदू रक्षा महाआघाडीने घेतली आहे.

दरम्यान, राज्यात यापुढे कोणीही कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केला, तर सरकार कडक कारवाई करेल, असा इशारा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पुन्हा दिला आहे. मुख्यमंत्री केवळ इशारा देऊनच थांबले, तर सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी धार्मिक भावना दुखावणाऱ्याला तत्काळ अटक केली पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे.

यापूर्वी फादर बोलमॅक्स पेरेरा यांनी शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यात त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. आक्रमक शिवप्रेमीच्या मागणीनंतर बोलमॅक्स पेरेरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण शांत होत असतानाच आता हे प्रकरण समोर आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

SCROLL FOR NEXT