Shane Sebastian Pareira gets Indian Citizenship Dainik Gomantak
गोवा

CAA: भारतीय म्हणून घेण्यासाठी 43 वर्षे पाहावी लागली वाट; गोव्यात दुसऱ्या पाकिस्तानी व्यक्तीला नागरिकत्व बहाल

Citizenship Act: जोसेफ परेरा यांच्यानंतर शेन परेरा भारतीय नागरिकत्व मिळालेले गोव्यातील दुसरे व्यक्ती ठरले आहेत.

Pramod Yadav

पणजी: कराची, पाकिस्तान येथे जन्म घेतलेल्या व्यक्तीला ४३ वर्षानंतर भारतीय नागरिकत्व मिळाले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते शेन सेबेस्तीयन परेरा यांना भारतीय नागरिकत्व कायद्यांतर्गत नागरिकत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले. गोव्यातील हे दुसरे नागरिकत्व असून, काही महिन्यांपूर्वी जोसेफ फ्रान्सिस परेरा यांना नागरिकत्व देण्यात आले होते.

शेन यांनी काही महिन्यांपूर्वी सीएए कायद्यांतर्गत भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी अर्ज केला होता. शेन यांच्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर त्यांना अखेर नागरिकत्व बहाल करण्यात आले आहे. जोसेफ परेरा यांच्यानंतर शेन परेरा भारतीय नागरिकत्व मिळालेले गोव्यातील दुसरे व्यक्ती ठरले आहेत.

भारतीय नागरिकत्व कायद्यांतर्गत (CAA) गोव्यातील अनेक नागरिकांना फायदा होईल, असा विश्वास प्रमोद सावंत यांनी यावेळी व्यक्त केला. शेन यांचा अर्ज तीन महिन्यात स्वीकारून मंजूर करण्यात आला. पाकिस्तान, बांगलादेश आणि आफगाणिस्तानमध्ये अडकून पडलेल्या हिंदू, ख्रिश्चन, जैन, पारसी, बौद्ध आणि सिख समुदायातील नागरिकांना याचा फायदा होईल, असे सावंत म्हणाले.

मूळ डिमेल्लो वाडो, हणजूण, गोवा येथे वास्तव्यास असणाऱ्या शेन यांचा जन्म ऑगस्ट १९८१ रोजी कराची पाकिस्तान येथे झाला होता. जन्मानंतर शेन गोव्यात मूळगावी शिफ्ट झाले होते. गोव्यातच त्यांनी शिक्षण पूर्ण करुन गोमंतकीय मारिया फर्नांडिस हिच्याशी २०१२ साली लग्न केले.

शेन यांनी भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी गेल्या काही वर्षापासून प्रयत्न केले पण यश आले नाही. पण, काही महिन्यांपूर्वी जोसेफ परेरा यांना नागरिकत्व मिळाल्यानंतर शेन यांनी देखील अर्ज केल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT