Leopard Death Dainik Gomantak
गोवा

Leopard Death : शिरवई केपेत आणखी एका बिबट्याचा फासात अडकून मृत्यू

पाडादेग शिरवई (केपे) येथे बिबट्या फासात अडकून गंभीर जखमी झाल्याने मृत झाल्याचे वनखात्यातर्फे सांगण्यात आले.

दैनिक गोमन्तक

Leopard Death : एका बाजूने राज्यात वेगवेगळ्या भागात जंगलांना आग लागण्याच्या वारंवार घटना घडत असून जंगलातील जनावरे आसरा घेण्यासाठी सुरक्षित जागा शोधण्यासाठी धडपडत असून सदर जनावरे काही लोकांनी शिकारीसाठी लावलेल्या फासात अडकून मरण पवण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. पाडादेग शिरवई (केपे) येथे बिबट्या फासात अडकून गंभीर जखमी झाल्याने मृत झाल्याचे वनखात्यातर्फे सांगण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार आज सकाळी 8.30 वा. एक युवक पाडादेग येथे एका कुळागरात बंद असलेल्या लॉज मध्ये आपल्या मित्रांसह विश्रांती घेण्यासाठी गेला असता त्याला लॉजमधील एका कोपऱ्यात बिबटा असल्याचे दिसून आल्याने त्यांनी सदर कुळागराची राखण करणाऱ्या व्यक्तीला बोलावून आणले व बिबट्या असल्याचे सांगितले.

सदर लॉज मध्ये जाऊन पाहणी केली असता बिबट्या कोणतीच हालचाल करीत नसल्याचे दिसून आल्याने याची माहिती केपे वनखात्याला दिली असता त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता मृत अवस्थेत असलेल्या बिबट्या वाघाच्या कंबरेला फास अडकून पडला होता व यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला मरण आल्याचे वनखात्यातर्फे सांगण्यात आले.

केपे वनखात्याचे वनाधिकारी विक्रमादित्य यांनी सदर घटनेचा पंचनामा करून बिबट्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT