Mapusa Accident : गोव्यात होणाऱ्या अपघातांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. या घटना थांबण्याचे नावच घेत नाहीत. काही वेळापूर्वी अपघाताची एक विचित्र घटना समोर आली आहे.
म्हापसा अग्निशमन केंद्राचे कर्मचारी प्रकाश घाडी (42) यांचा शिरसई येथे अपघात झाला. हा स्वयं अपघात होता. अपघातानंतर प्रकाश कारमध्ये अडकून राहिले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी त्यांची गाडीतून सुटका केली.
या घटनेत प्रकाश जखमी झाले असून त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
दरम्यान, म्हापसा उपविभागाने वाहतूक नियम उल्लंघनप्रकरणी चालकांकडून फेब्रुवारी ते 7 मार्चपर्यंत 16 लाख रुपये दंड वसूल केला. तर छायाचित्रण उपक्रमाद्वारे वाहतूक उल्लंघनासाठी 300 जणांना नोटिसा बजावल्या. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करताना म्हापसा उपविभागाने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चलन देण्याचे आक्रमक अभियान सुरू केले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.