Celebrate Gomantak Digital team
गोवा

कुर्डी-सांगेतील श्री सोमेश्‍वराचा वार्षिक उत्सव साजरा

महानैवेद्याचे वाटप : धरणातील भग्नावशेषांचे दर्शन, कर्नाटक, महाराष्ट्रातून भाविकांचे आगमन

गोमन्तक डिजिटल टीम

सांगे : कुर्डी-सांगे येथील साळावली धरणात गेलेले आराध्य दैवत श्री सोमेश्वर देवाच्या वार्षिक उत्सवाला गोवा, महाराष्ट्र आणी कर्नाटक राज्यातील भाविकांनी आज गर्दी केली. सकाळपासून संध्याकाळपर्यंत किमान सात हजार भाविकांनी सोमेश्वर देवाचे दर्शन घेतल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. दुपारी महानैवेद्य वाटण्यात आला. यंदा धरणातील पाण्याची पातळी बरीच खालावल्यामुळे कित्येक भाग्नावशेष जवळून पाहता आले.

दरवर्षी मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात हा उत्सव साजरा करण्यात येतो. सकाळी अभिषेक, पूजा करण्यात आली. कुर्डी गावात वीजपुरवठा नसला तरी भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, म्हणून सर्व ती व्यवस्था करण्यात आली होती. भाविक म्हणून येणाऱ्यांना महानैवेद्य कमी पडू नये, याची काळजी आयोजकांकडून घेतली जात होती.

श्री सोमेश्वर देवाचे भाविक कारवार, बेळगावपासून महाराष्ट्र सीमेवरील भागातून तसेच गोव्याच्या कानाकोपऱ्यातून सोमेश्वर देवाचे भाविक मोठ्या प्रमाणात कुर्डी गावात दाखल झाले होते. कुर्डी गाव स्थलांतर केल्यास जवळ पास चाळीस वर्षे होत आली. मात्र गावाची ओढ अजून कायम असल्यामुळे बालगोपाळांसोबत घेऊन कुर्डी गावात फेरफटका मारण्यासाठी येतात.

28 रोजी जिजसचे फेस्त

पुढील रविवार 28 रोजी सिक्रेट हार्ट ऑफ जिजसचे वार्षिक फेस्त असल्यामुळे अशा प्रकारची गर्दी होण्याची शक्यता आहे. सुट्टीचे दिवस असल्यामुळे सध्या कुर्डी गावाला पर्यटन स्थळाचे रूप प्राप्त झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: तिस्क-उसगाव येथे मध्यरात्री दुचाकीचा भीषण अपघात

Dabos Valpoi: दाबोस-वाळपई रस्ता धोकादायक अवस्थेत! खोदकामामुळे मार्गाची दुर्दशा; अपघाताची शक्यता

Navelim Bele Junction: नावेली-बेले जंक्शनवर अनेक त्रुटी, रस्ते सुरक्षा समितीकडून पाहणी; साबांखा अधिकारी मात्र अनुपस्थित

Porvorim: पर्वरीतील कोंडीत वाहतूक पोलिसांचे हाल! रखरखत्या उन्हात होते आहे होरपळ

Dodamarg Excise Building: दोडामार्ग ‘अबकारी’ कार्यालयाची दुर्दशा! छपरावर आच्छादन, फुटकी कौले; त्वरित दुरुस्तीची मागणी

SCROLL FOR NEXT