Goa Budget 2023-24 Dainik Gomantak
गोवा

Goa Budget 2023-24: शेतकऱ्यांसाठी 'या' महत्वपूर्ण योजनांची घोषणा, कृषी खात्यासाठी 'इतक्या' कोटींची तरतूद

मुख्यमंत्री प्रगत शेतकरी योजनेद्वारा कृषी उत्पादनासाठी प्रोत्साहन देण्यात येणार

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Budget 2023-24 गोवा अधिवेशनात आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अर्थसंकल्प सादर करताना पशुपालकांसाठी असलेल्या योजना सादर केल्या आहेत. यांजसोबत शेतकरी वर्गासाठीही किफायतशीर योजना जाहीर केल्या आहेत.

कृषी खात्यासाठी 277 कोटींची तरतूद असल्याची माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी आज अधिवेशनात दिली. मुख्यमंत्री प्रगत शेतकरी योजना राबवण्यात येणार असून याद्वारा कृषी उत्पादनासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत कृषी खात्यासाठी 277 कोटींची तरतूद करण्यात आली असून ड्रोन उत्पादकांशी सरकार भागीदारी करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच या योजनेद्वारे कृषी उत्पादनासाठी प्रोत्साहन देण्यात येणार असून नारळ, काजू आणि तांदळाच्या आधारभूत किंमतीत वाढ करण्यात आली आहे.

आधारभूत किमती वाढवताना नारळाचा दर 12 वरून 15 रुपयांपर्यंत वाढला असून काजू 125 ते 150 रुपये आणि तांदूळ 20 ते 22 रुपये करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना दर 20 हजार हेक्टरवर नाचणी बियाणांचे मोफत वाटप करण्यात येणार असल्याची माहितीही सावंत यांनी यावेळी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: तरुणीची अजब ड्रायव्हिंग स्टाईल व्हायरल, व्हिडिओ पाहून नेटीझन्स लोटपोट; म्हणाले, ''ब्रेकअप करुन आली...''

शनिदेवाची वक्रदृष्टी संपली, आता सुरु होणार सुखाचे दिवस! 'या' दोन राशींचे भाग्य अचानक चमकणार; डिसेंबरपर्यंतचा काळ ठरणार खास

Cricketer Passes Away: क्रिडाविश्वात शोककळा! माजी क्रिकेटपटूचे वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी निधन; दिल्लीत सुरू होते उपचार

Stray Dogs Virus: भटक्या कुत्र्यांना 'व्हायरस'ची लागण? कुत्र्यांच्या मृत्यूच्या घटनांत वाढ, डिचोलीत चिंता

Syria Bomb Blast: सीरियात हॉटेलबाहेर भीषण स्फोट! फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष थोडक्यात बचावले, 6 जणांचा मृत्यू VIDEO

SCROLL FOR NEXT