Anmod Ghat Road Update Dainik Gomantak
गोवा

Anmod Ghat: अनमोड घाटाबाबत नवी अपडेट! अवजड वाहतुकीसाठी रस्ता राहणार बंद; 'या' वाहनांना मिळणार सूट

Anmod Ghat Road Update: अनमोड घाटात शुक्रवारी रात्री रस्ता खचल्याने वाहनांना धोका निर्माण झाला होता. त्यामुळे लगेच या रस्त्याची सिमेंट कॉंक्रिट घालून दुरुस्ती केली होती.

Sameer Panditrao

फोंडा: अनमोड घाटात शुक्रवारी रात्री रस्ता खचल्याने वाहनांना धोका निर्माण झाला होता. त्यामुळे लगेच या रस्त्याची सिमेंट कॉंक्रिट घालून दुरुस्ती केली होती. मात्र, आठच तासांत हा रस्ता कोसळला.

सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता योगेश शहापूरकर आणि साहाय्यक अभियंता आनंद वाघुर्मेकर यांनी घटनास्थळी पाहणी केली. याठिकाणी जी संरक्षक भिंत होती, ती ४० वर्षांपूर्वीची होती. ती कोसळल्यामुळे हा रस्ता खचला.

शनिवारपासून ही संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू केले आहे, असे योगेश शहापूरकर यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता योगेश शहापूरकर आणि साहाय्यक अभियंता आनंद वाघुर्मेकर यांनी घटनास्थळी पाहणी केली.

अवजड वाहतुकीस ६० दिवस प्रतिबंध

अनमोड घाटातील रस्ता खचल्याने तो अवजड वाहतुकीसाठी ६० दिवस बंद ठेवण्याचा आदेश दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनी जारी केला. मात्र, हा आदेश प्रवासी बसेस, अत्यावश्यक सोयीसाठी वापरली जाणारी वाहने यांना लागू नाही. या बंदी काळात साबांखाने रस्ता दुरुस्त करावा, असे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT