Anmod Ghat Accident: ..आणि ट्रक दरीत कोसळण्यापासून वाचला! अनमोड घाटात अपघात; चारजण जखमी

Dudhsagar Temple Road Accident: अनमोड घाटातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या दूधसागर देवस्थानसमोर कार व इलेक्ट्रिक मालवाहू ट्रक यांच्यात बुधवारी (ता.२३) सकाळी ८.३० वा. अपघात झाला.
Goa Accident News
Goa Accident NewsDainik Gomantak
Published on
Updated on

कुळे: अनमोड घाटातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या दूधसागर देवस्थानसमोर कार व इलेक्ट्रिक मालवाहू ट्रक यांच्यात बुधवारी (ता.२३) सकाळी ८.३० वा. अपघात झाला. यात ट्रकमधील चालक नानासाहेब पोतबारे (४०) व क्लिनर किशोर गुरव (२४) तसेच कारमधील जखमी झालेले आके-मडगाव येथील विजय नावले (४४) व संजय नावले (४९) हे दोघे जखमी झाले आहे.

कुळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटक राज्यातून मालवाहू ट्रक गोव्यात येत होता तर कार गोव्याहून बेळगावला जात होती. दूधसागर देवाच्या दर्शनासाठी कार बाजूला थांबवली असता वरून येणाऱ्या ट्रकने कारला डाव्या बाजूने धडक देत ट्रकने सायबीण व खुरीस असलेले देवस्थान मोडून टाकले.

Goa Accident News
Mollem Accident: मोलेतील धोकादायक वळणावर भीषण अपघात; ट्रक-वॅगनरच्या धडकेत चौघे जखमी

दैव बलवत्तर म्हणून पुढे असलेल्या झाडामुळे ट्रक दरीत कोसळण्यापासून वाचला. कारमधील अन्य दोघेही जखमी झाल्याचे कुळे पोलिसांनी सांगितले. जखमी झालेल्या चौघांनाही तिस्क येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवून दिले होते. कुळे पोलिस निरीक्षक राघोबा कामत यांच्या मार्गदर्शनखाली हवलदार भैरू झोरे यांनी अपघाताचा पंचनामा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com