Anmod Ghat Dainik Gomantak
गोवा

Anmod Ghat: दरड हटवली! दहा तासानंतर अनमोड घाट वाहतुकीस खुला

Anmod Ghat Open for vehicular Traffic: अनमोड घाट कर्नाटकात बेळगाव आणि खानापूरला जोडणारा महत्वाचा घाट आहे.

Pramod Yadav

मुसळधार पावसामुळे दरड कोसळून वाहतुकीस बंद झालेला अनमोड घाट अखेर वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. अग्निशमन दल आणि आपत्ती निवारण कर्मचाऱ्याच्या वतीने अथक प्रयत्नानंतर मार्ग खुला केला आहे. गुरुवारी (दि.१८) पहाटेच्या सुमारास दरड कोसळल्याने घाट वाहतुकीस बंद केला होता.

Anmod Ghat

दरड कोसळल्यानंतर प्रशासनाने तात्काळ दखल घेतली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होत त्यांनी दरड हटविण्याचे काम सुरु केले. अखेर आठ ते दहा तासानंतर अनमोड घाट वाहतुकीस खुला करण्यात आला आहे.

दक्षिण गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवर असणारा अनमोड घाट कर्नाटकात बेळगाव आणि खानापूरला जोडणारा महत्वाचा घाट आहे. तसेच, महाराष्ट्रातील कोल्हापूरला जाण्यासाठी देखील हा घाट महत्वाचा मानला जातो.

अनमोड घाटात दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला होता. अखेर दरड हटविल्यानंतर मार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला आहे.

गोव्यात सततच्या सुरु असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडत आहेत. गुरुवारी सत्तरी आणि वाळपई तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या. रगाडा नदीला पूर आल्याने वाळपईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक खोळंबली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT