anmod ghat accident  Dainik Gomantak
गोवा

Anmod Ghat Accident: अनमोड घाटात कार पुलावरून खाली कोसळली; दाट धुक्यामुळे अपघात...

तिघे जखमी; सुदैवानी जीवीतहानी नाही

Akshay Nirmale

Anmod Ghat Accident: गोवा आणि कर्नाटक यांना जोडणाऱ्या अनमोड घाटात बुधवारी एका कारचा अपघात झाला. दाट धुक्यामुळे चालकाला रस्ता न दिसल्याने ही गाडी पुलावरून थेट २० फूट खाली कोसळली. अनमोड घाटातील कर्नाटक हद्दीत हा अपघात घडला.

बुधवारी सायंकाळी हुबळी येथून ही सिलेरो कार (GA-09-D-3027) सावर्डे गोवा या दिशेने येत होती. यावेळी अनमोड घाटात कर्नाटकच्या हद्दीत ही कार गोवा-कर्नाटक सीमेलगत असणाऱ्या पुलावरुन खाली कोसळली. साधारण वीस फूट खाली ही कार कोसळली.

येथील पुलाला संरक्षक कठडे नसल्याने आणि दाट धुक्क्यामुळे ड्रायव्हरला समोरचे काही न दिल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने या अपघातात जीवीतहानी झालेली नाही. तथापि, कारमधील तीनही प्रवासी जखमी झाले आहेत.

त्यांना कारमधून बाहेर काढून उपचारासाठी जवळच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. या वेळी दाट धुक्क्यामुळे येथे संथगतीने वाहतूक सुरू होती.

अपघाताची माहिती मिळताच कर्नाटक व गोवा पोलिस अपघातस्थळी दाखल झाले. जखमींना गोवा तसेच कर्नाटक पोलिसांनी एकमेकांच्या सहकार्याने दरीतुन वर काढले आणि मुख्य मार्गावर आणले.

अधिक उपचारासाठी गोविंद रामा गावस देसाई (वय ६५, काले) यांना मणीपाल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे तर आणखी एक जखमी कालीदास धुमस्कर (वय ७५) यांच्यावर गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत.

या गाडीचा चालक किरकोळ जखमी झाल्याने त्याला उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Case: शिवोलीत 8.5 लाखांच्या अमलीपदार्थांसह नायजेरियन नागरिकाला अटक, गुन्हे शाखेची कारवाई

Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

Goa Politics: खरी कुजबुज; विजय मुख्यमंत्री झाले तर...

Goa Cashew: अस्सल गोमंतकीय काजू जगभरात पोहोचवणार! डॉ. दिव्या राणे यांचा विश्‍वास, शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य

SCROLL FOR NEXT