Tourism Police: गोवा, केरळच्या धर्तीवर उत्तराखंडदेखील नेमणार 'टुरिझम पोलिस'; 100 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

पर्यटकांशी संवाद साधणे, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पर्यटन पोलिसांची गरज
Tourism Police At Uttarakhand
Tourism Police At Uttarakhand Dainik Gomantak

Tourism Police: गोवा आणि केरळच्या धर्तीवर आता उत्तराखंडमध्येही लवकरच पर्यटन पोलिस नेमण्यात येणार आहेत. याशिवाय उत्तराखंड पोलिस इतर काही राज्यांच्या पर्यटन पोलिसांच्या रचनेचाही अभ्यास करत आहेत. यानंतर कायमस्वरूपी पर्यटन पोलिस स्थापन करण्याचा प्रस्ताव पाठवला जाणार आहे. (World Toursim Day 2023)

उत्तराखंडला देखील दरवर्षी पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. येथे अनेक शहरात वर्षभर पर्यटक येत असतात. तीर्थयात्रेसाठी उत्तराखंड प्रसिद्ध आहे. त्यामुळे पर्यटकांचा सतत राबता येथे असतो.

त्यातून पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी, त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पर्यटन पोलिसांची गरज व्यक्त केली जात आहे.

Tourism Police At Uttarakhand
Bharat Gaurav Tourist Train: गोव्याला येणार भारत गौरव टुरिस्ट ट्रेन; 28 सप्टेंबरला मदुराईतून सुटणार...

उत्तराखंड पोलिसांचा अभ्यास

गेल्या वर्षी पर्यटन मंत्रालयाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. यात सर्व राज्यांना त्यांच्या पर्यटन पोलिस तयार करण्यास सांगितले होते. त्यामुळे आता उत्तराखंड पोलिस दल केरळ आणि गोवा पोलिसांच्या रचनेचा अभ्यास करत आहेत.

या दोन राज्यातील पर्यटन पोलिसांच्या धर्तीवर उत्तराखंडमध्येही टुरिझम पोलिसांची स्थापना करण्यात येणार आहे. लवकरच टुरिझम पोलिसांच्या रचनेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. सरकारशी सल्लामसलत केल्यानंतरच ही रचना किती मोठी असेल याचा निर्णय घेतला जाईल.

पर्यटन पोलिसांसाठीही स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. उत्तराखंडमधील पर्यटनाला चालना देण्यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण मॉड्यूलही ठरवले जाईल.

Tourism Police At Uttarakhand
Goa Tourism: गोव्याला मागे टाकून वाराणसी नंबर वन! पर्यटकांच्या संख्येत मारली बाजी...

सध्या 100 पोलीस तैनात

दरवर्षी चारधाम यात्रेदरम्यान तात्पुरत्या पर्यटक पोलिस चौक्या उभारल्या जातात. यंदा चारधाम यात्रेच्या सुरुवातीला 100 पोलिसांना प्रशिक्षण देण्यात आले. या पोलीस कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या राज्यांच्या भाषाही शिकवल्या जात होत्या. जेणेकरून इतर राज्यातील लोकांशी सहज संवाद साधता येईल.

राज्याच्या इतिहास, भूगोलाची माहिती पोलिस ठेवणार

टुरिझम पोलीस हे पर्यटकांना कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने मदत तर करतीलच पण गाईड म्हणूनही मदत करणार आहेत. त्यासाठी पोलिसांना राज्याच्या इतिहास आणि भूगोलाची माहितीही दिली जाणार आहे. त्यांना महत्त्वाची ठिकाणे, मंदिरे इत्यादी याविषयी तपशीलवार सांगितले जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com