Illegal Encroachment  Dainik Gomantak
गोवा

Anjuna: हणजूण भागातील बेकायदा बांधकामे उद्ध्वस्त, उच्च न्यायालयाचा आदेश; रस्ता रुंदीकरणासाठी कारवाई

Anjuna Illegal Construction: यापुढेही मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणास अडथळा ठरणाऱ्या हणजूण-कायसूव तसेच इतर पंचायत क्षेत्रातील बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Sameer Panditrao

कळंगुट: हणजूण-कायसूव पंचायत क्षेत्रातील म्हापसा शहर ते हणजूण-वागातोर येथील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाला अडथळा ठरणारी अनेक बेकायदा बांधकामे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शनिवारी पाडण्यात आली. यावेळी स्थानिक पंचायत मंडळ तसेच संबंधित खात्याचे अधिकारी आणि पोलिस फौजफाटा उपस्थित होता.

म्हापसा ते हणजूण येथील मुख्य रस्त्याला लागूनच असलेल्या तसेच रस्त्याच्या रुंदीकरणास अडथळा ठरणाऱ्या अनेक बेकायदा बांधकामांना मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या, तसेच त्या बेकायदा बंधकामासंबंधात मालकांना कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

Margao Encroachment

बेकायदा बांधकामासंदर्भात मालकांना पंधरा दिवसांचा अवधी दिलेला असतांनाही संबंधितांकडून त्या बांधकामांसंदर्भात कुठल्याच प्रकारची कागदपत्रे पंचायत कार्यालयात अथवा तत्सम प्राधिकारणात सादर करण्यात न आल्याने शनिवारी सकाळी ही बांधकामे पाडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यापुढेही मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणास अडथळा ठरणाऱ्या हणजूण-कायसूव तसेच इतर पंचायत क्षेत्रातील बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्यात येणार असल्याचे संबंधितांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT